शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
5
ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे  कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
6
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
7
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
8
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
9
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
10
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
11
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
12
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
13
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
14
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
15
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
16
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
17
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
18
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
19
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
20
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 12:32 IST

Rohit Pawar News: महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ फेररचनेशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली आहे. सरकारकडून आरोप होत असताना आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली आहे. 

"२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपा अब की बार ४०० पार भाजपा म्हणत होते. ते जर निवडून आले असते, तर त्यांनी संविधान बदलले असते. खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न हा संविधान बदलण्याचाच प्रयत्न चालू होता. या बिलामध्ये जी घाईगडबड केली गेली, ती २०२९ मध्ये आपण निवडून येणार नाही ही भाजपाची भूमिका दिसतेय. त्यांचा प्रयत्न होता की, झटपट या गोष्टी करायच्या आणि २०२७ किंवा २०२८ मध्ये लोकसभा निवडणुका घ्यायच्या. डिलिमिटेशनच्या माध्यमातून विरोधकांचे उमेदवार पाडायचे आणि पुन्हा सत्ता घ्यायची", असा गंभीर दावा आमदार रोहित पवार यांनी केला. 

रोहित पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन महिला आरक्षण आणि मतदारसंघ फेररचनेशी संबंधित घटना दुरुस्ती विधेयकावर सादरीकरण केले. 

"आता भाजपाकडे मुद्दाच नाहीये"

"भाजपा मतदारसंघ फेररचना का करतेय, कारण त्यांची लोकप्रियता... २०१४ मध्ये विकासाच्या मुद्द्यावर भाजपा आली. नंतर विकासाचा मुद्दा संपला. २०१९ मध्ये राष्ट्रभावना... उरी आणि इतर गोष्टींवर त्यांनी राजकारण केले. २०२४ मध्ये वेगळे मुद्दे घेऊन ते निवडून आले. आता त्यांच्याकडे मुद्दाच नाही म्हणून ते डिलिमिटेशनचा मुद्दा घेऊन ते पुढे निघाले आहेत", असे आमदार रोहित पवार म्हणाले. 

मतदारसंघ फेररचना समितीवरच प्रश्न 

"यामध्ये कमिटी आहे. अमित शाह म्हणतात की, आम्ही तुमचा शब्द ऐकतो. त्यांनी कितीही ऐकलं तरी सगळं जाणार आहे कमिटीकडे. कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती. काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवालांनी मुद्दा मांडला की, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत आणि त्यांची मुले सरकारी वकील आहेत. त्या न्यायमूर्तीही आरएसएसच्या कार्यकर्त्या आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्रातही मी एका न्यायमूर्तींबद्दल हा मुद्दा उचलला होता. उद्या जर भाजपा विचाराच्या न्यायमूर्तीला अध्यक्ष केले. त्यात सदस्य कोण आहेत तर मुख्य निवडणूक आयुक्त, हे आयुक्त कसे काम करतात वेगळं सांगणार नाही; ते भाजपाचीच बी टीम आहेत", असा आरोप रोहित पवार यांनी केला.

पुनर्रचना करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच भाजपाने नोकरी घेतले 

"केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाने ठरवले की महाराष्ट्रात २०११ च्या जनगणनेनुसार मतदारसंघ फेररचना, गुजरातमध्ये २००१ च्या जनगणनेनुसार करणार. काही निर्णय घेऊ शकतात. २०११ मध्ये मतदारसंघ फेररचना झाली. त्या प्रक्रियेमध्ये जे अधिकारी होते, त्यातील अनेक अधिकाऱ्यांना भाजपाने नोकरीवर घेतले आहे. त्यांनी वेगळे काम त्यांच्या कार्यालयात सुरू केलं आहे. म्हणजे मला पाडायचं असेल, तर मतदारसंघातील कोणता भाग तोडायचा", असे रोहित पवार म्हणाले. 

"निवडणूक आयोग ताब्यात, सगळं ताब्यात. मग हा केविलवाणा प्रयत्न होता. महिलांचं नाव पुढे करायचं, त्यांच्या नावाचा वापर करून मतदारसंघ फेररचना आणि खासदारांची संख्या वाढवायची. ही संख्या भाजपाला फायदा होईल अशा पद्धतीने वाढवायची. हाच प्रयत्न या संसदेच्या विशेष सत्रामध्ये केला. त्यांनी वरून टूलकीट पाठवलं आणि सर्व मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषद घ्यायला लावल्या", असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Attempting Elections in 2027: Rohit Pawar Alleges Hasty Actions

Web Summary : Rohit Pawar claims BJP aims for 2027 elections by manipulating constituency delimitation to weaken opposition. He accuses BJP of using women's reservation for political gain and controlling election machinery for its benefit, alleging a calculated strategy to retain power.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारWomen Reservationमहिला आरक्षणBJPभाजपाPoliticsराजकारण