शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:52 IST

Lori Deremer Resignation inside story: त्यामुळे महिला मंत्री आणि त्यांच्या विभागातील इतर चार अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे

Lori Deremer Resignation inside story: अमेरिकेतील ट्रम्प सरकारच्या कामगार मंत्री सचिव लॉरी चावेझ-डेरेमर यांच्या राजीनाम्यासंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. अमेरिका संकटकाळात असताना सरकारी निधीचा वापर करून पूल पार्टी आयोजित केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या चौकशीनंतर, डेरेमर यांनी नैतिक कारणास्तव आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. ट्रम्प मंत्रिमंडळातील सदस्यांचा हा अलीकडील तिसरा राजीनामा आहे. ५८ वर्षीय लॉरी चावेझ यांची ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात कामगार मंत्री म्हणून मंत्रिमंडळात नियुक्ती करण्यात आली होती. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, ५८ वर्षीय लोरी यांनी गैरवर्तणूक चौकशीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विभागातील इतर चार अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. या सर्वांवर अमेरिकेतील शटडाउन दरम्यान पूल पार्टी आयोजित केल्याचा आरोप आहे.

व्हाइट हाऊसचे प्रवक्ते स्टीव्हन च्युंग म्हणाले की, डेरेमर यांनी खाजगी क्षेत्रात करिअर करण्यासाठी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ एका वर्षात त्यांनी कामगार क्षेत्रासाठी जे काही केले आहे ते उल्लेखनीय आहे, असेही ते म्हणाले. पण असे असले तरीही या राजीनाम्यामागचे मूळ कारण देश संकटात असताना आणि युद्ध सुरु असताना देशाची महिला मंत्री पूल पार्टी करण्यात व्यस्त होती अशी चर्चा रंगली आहे.

डेरेमर यांनी राजीनामा का दिला?

न्यूयॉर्क पोस्टने एका तक्रारीच्या आधारे डेरेमरबद्दल वृत्त दिले. त्यात असा आरोप करण्यात आला होता की, डेरेमर आपल्या कर्मचाऱ्यांवर ओरडत असे आणि किंचाळत असे. इतकेच नाही, तर ती काम करत असताना मद्यपानही करत असे. डेरेमरवर सरकारी निधी वापरून आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना दौऱ्यांवर पाठवल्याचा आरोपही होता, जे बेकायदेशीर होते. डेरेमरवर अधिकाराचा गैरवापर केल्याचाही आरोप होता. त्याच्या सुरक्षा रक्षकांवरही विविध आरोप करण्यात आले होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये अमेरिकन सरकारने शटडाउनची घोषणा केली तेव्हा डेरेमर चर्चेत आल्या. त्या त्यांच्या मित्रांसोबत एका पूल पार्टीला गेल्या, ज्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली.

प्राथमिक चौकशीनंतर राजीनामा

अहवालानुसार, प्राथमिक तपासात असे आढळून आले की, डेरेमर कर्तव्यावर असताना क्लबमध्ये मित्रांसोबत मद्यपान करत होत्या. इतकेच नव्हे तर, त्यांनी सार्वजनिक दौऱ्यांसाठी सरकारी निधीचा वापर केल्याचे आरोपही खरे ठरले. हा तपास अहवाल सिनेटला पाठवण्यात आला, ज्यानंतर डेरेमर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's minister faces crisis: 'Pool party' amid national shutdown.

Web Summary : Labor Secretary Lori Deremer resigned amid allegations of misusing funds for a pool party during a government shutdown. Accusations include berating staff, public intoxication, and unauthorized travel expenses. An internal investigation confirmed the misuse of funds, prompting her resignation and sparking controversy.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरministerमंत्री