शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 15:33 IST

MP Reel Stunt Accident: जीवघेणा स्टंट आणि अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे

MP Reel Stunt Accident: सोशल मीडियावर झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणाई कोणत्या थराला जाऊ शकते, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये एकाच दुचाकीवर बसून रील बनवत असताना झालेल्या अपघातात तीन सख्ख्या चुलत भावांचा अंत झाला आहे.

नेमकं काय घडलं?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एका दुचाकीवर तीन तरुण स्वार आहेत. मागे बसलेला एक तरुण हातामध्ये कट्टा (गावठी रिव्हॉल्व्हर) घेऊन ते हवेत नाचवताना दिसत आहे आणि आपला धाक जमवण्याचा प्रयत्न करत आहे. दुचाकी चालवणाऱ्या तरुणाने आपला चेहरा कपड्याने झाकलेला होता. तो इतर वाहनांना धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करत आणि नागमोडी (Zig-zag) पद्धतीने दुचाकी चालवून स्टंट करत आहे. दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुचाकी समोरून येणाऱ्या वाहनावर किंवा रस्त्याच्या कडेला आदळते. हा अपघात इतका भीषण होता की, तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

प्रसिद्धीचा हव्यास जीवावर बेतला

हे तरुण इन्स्टाग्राम किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी रील रेकॉर्ड करत होते. व्हिडिओमध्ये त्यांचा उत्साह दिसत आहे, पण त्याच उत्साहात त्यांनी वाहतुकीचे नियम आणि स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. अपघाताच्या काही सेकंद आधीचा हा व्हिडिओ आता त्यांच्या मृत्यूचा पुरावा ठरला. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तरुणांना आणि पालकांना कडक इशारा दिला आहे. रस्त्यावर स्टंट करणे हे केवळ बेकायदेशीरच नाही, तर जीवघेणेही आहे असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Reel Stunt Turns Deadly: Three Brothers Killed in Bike Accident

Web Summary : Three brothers died in Madhya Pradesh while filming a dangerous bike stunt for social media. The speeding bike crashed, killing all three instantly. Police warn against reckless stunts.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया