भारताचे माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांची सासरची मंडळी मारहाण प्रकरणामुळे अडचणी आली आहे.. युसूफ पठाणचे सासरे खालिद खान आणि मेहुणा उमरशाद खान आणि आणि आणखी एकाला मुंबईतील भायखळा पोलिसांनी अटक केली आहे.
शनिवारी रात्री सुमारे वाजण्याच्या सुमारास कारमुळे पाणी उडाल्याने झालेल्या वादातून मारहाणीची ही घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार भायखळा येथील स्थानिक रहिवासी युसूफ खान हे त्यांच्याकडील कारमधून घरी जात होते. तेव्हा अचानक कार रस्त्यावरील एका खड्ड्यातून गेली आणि पाणी उडून ते शोएब खान याच्यावर पडले. तेव्हा युसूफ खान यांनी कार उभी करून माफी मागितली. मात्र संतापलेल्या शोएब याने शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच संतापाच्या भरात कारची काच फोडली. यात युसूफ खान हे जखमी झाले. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.
या दरम्यान, पोलीस ठाण्यात जात असताना युसूफ खान यांची गाठ युसूफ पठाणचे सासरे खालिद खान यांच्याशी पडली. यावेळी खालिद खान यांनी त्यांचा मुलगा उमरशाद खान आणि शोएब खान तसेच अन्य एक आरोपी शहबाज पठाण यांच्यासोबत मिळून युसूफ खान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत भांडण केले. तसेच त्यांना मारहाणही केली.
त्यानंतर तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रिकरणाचा तपास करून खालिद खान, उमरशाद खान आणि शोएब खान यांना अटक केली. या प्रकरणाील आणखी एक आरोपी शाहबाज पठाण हा सध्या फरार आहे. तसेच पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Web Summary : Yusuf Pathan's father-in-law and brother-in-law were arrested for assault after a road rage incident in Mumbai. The police are searching for another accused. The court has remanded the arrested individuals to judicial custody until May 2nd.
Web Summary : मुंबई में सड़क पर झगड़े के बाद युसूफ पठान के ससुर और साले को मारपीट के आरोप में गिरफ्तार किया गया। पुलिस एक और आरोपी की तलाश कर रही है। अदालत ने गिरफ्तार लोगों को 2 मई तक न्यायिक हिरासत में भेज दिया है।