Virat Kohli Anushka Sharma Vrindavan Premanand Maharaj: IPL 2026 च्या उत्साहाच्या वातावरणात स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाला भेट दिली. त्यांची वृंदावन भेट अक्षय्य तृतीयेच्या विशेष प्रसंगी झाली. त्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. विराट आणि अनुष्का यांनी यापूर्वीही अनेक वेळा या आश्रमाला भेट दिली आहे. त्यांच्या मागील भेटींमध्ये ते प्रेमानंद महाराजांसोबत जीवनातील मूलभूत तत्त्वे, क्षमाशीलतेचे महत्त्व आणि नातेसंबंधांशी संबंधित विषयांवर चर्चा करताना दिसले होते.
वृंदावनला पोहोचण्यापूर्वी विराट-अनुष्का हे जोडपे बंगळुरुमध्ये दिसले होते. आयपीएलमध्ये विराट कोहलीची बॅट तळपली आहे. त्याचा संघ, आरसीबी देखील या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. संघाने आतापर्यंत सहा सामने खेळले असून, त्यापैकी चार जिंकले आहेत आणि आठ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्स या हंगामात आतापर्यंत अपराजित राहून अव्वल स्थानी आहे. याचदरम्यान, विराट-अनुष्काने वृंदावनमध्ये जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतली.
IPL मध्ये कोहलीची कामगिरी
आयपीएल २०२६ मधील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीवर नजर टाकल्यास, हेनरिक क्लासेन सहा सामन्यांमध्ये २८३ धावांसह अव्वल स्थानी आहे. तर, किंग कोहलीने सहा सामन्यांमध्ये २४७ धावा केल्या आहेत. आतापर्यंत कोहलीने २८ चौकार आणि सहा षटकार मारले आहेत. या काळात त्याने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत.
Web Summary : Amidst IPL 2026, Virat Kohli and Anushka Sharma visited Premanand Maharaj in Vrindavan, seeking blessings. Kohli's strong IPL performance sees him among top run-scorers as Royal Challengers Bangalore shines, securing a high position in the league.
Web Summary : आईपीएल 2026 के बीच, विराट कोहली और अनुष्का शर्मा ने वृंदावन में प्रेमानंद महाराज से आशीर्वाद लिया। कोहली का शानदार आईपीएल प्रदर्शन जारी है, वे शीर्ष रन-स्कोरर में हैं और आरसीबी लीग में उच्च स्थान पर है।