शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

सोसायटीचा सुरक्षारक्षकच निघाला चोर, पंचवीस तोळे सोन्याच्या दागिन्यांची केली चोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2021 5:43 PM

अटक आरोपीमध्ये एका सोनाराचा देखील समावेश....

ठळक मुद्देदहा लाख रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

विमाननगर : लोहगाव येथील एका उच्चभ्रू  सोसायटीच्या फ्लॅटमधील 25 तोळे सोन्याचे दागिने चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला विमानतळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. याच सोसायटीत पूर्वी  "तो" सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून यांच्याकडून दहा लाख रुपये किमतीचे 20 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. अटक आरोपीमध्ये एका सोनाराचा देखील समावेश आहे.  

संतोष उर्फ लारा काशिनाथ जाधव (वय 35 रा. पोरवाल रोड लोहगाव) याच्यासह त्याचा साथीदार संतोष उर्फ रॉकी  अरुण धनवजीर (वय 34 रा. निंबाळकर नगर लोहगाव) यांच्यासह चोरीचे सोने खरेदी करणारा सोनार अशोक गणेशलाल जानी (वय 54 रा. शनिवार पेठ सातारा) या तीन आरोपींना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

सौरभ कुंदन हे लोहगाव डी.पी. रोड येथील न्याती एव्हीटा उच्च या सोसायटीत राहतात. 30 डिसेंबर रोजी वडिलांना भेटण्यासाठी कात्रज येथे कुटुंबियांसमवेत गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटमधील लॉक तोडून कपाटातून 25 तोळे सोन्याचे दागिने चोरी केले होते. विमानतळ पोलीस ठाणे तपास पथकातील तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातम्या आधारावरून आरोपींचा शोध घेत असताना याच सोसायटीत पूर्वी सुरक्षारक्षकांना काम करणाऱ्या संतोष उर्फ लारा जाधव यानेच घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी केल्याचा गुन्हा केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून त्याला ताब्यात घेऊन अधिक तपासात त्यानेच संतोष उर्फ रॉकी धनवजीर याच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले. चोरी केलेले दागिने त्यांनी सातारा येथील सोनार अशोक जानी यांना विक्री केल्याचे निष्पन्न झाले. 

पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, गुन्हा निरीक्षक मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गिरी, पोलीस कर्मचारी अविनाश शेवाळे, अशोक आटोळे, उमेश भेंडे, रमेश लोहकरे, विशाल गाडे, संजय आढारी, विनोद महाजन, सचिन भिंगारदिवे, नाना कर्चे, अरुण पठाण, राहुल मोरे, किरण अबदागिरे, वैभव खैरे, प्रशांत कापुरे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास लावला.: 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकGoldसोनंThiefचोर