शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा : कोकण, मराठवाड्यातही पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 20:57 IST

बंगालच्या उपसागरात औंध प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे तेलंगणा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडात पुढील दोन ते तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता आहे़.

पुणे : बंगालच्या उपसागरात औंध प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्यामुळे तेलंगणा, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडात पुढील दोन ते तीन दिवस सर्वदूर पावसाची शक्यता आहे़.  १८ व १९ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ . बंगालच्या उपसागरात औंध प्रदेशच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्या असून ते पुढील २४ तासात पश्चिमेच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे़. 
गेल्या २४ तासात पडलेला पाऊस वैभववाडी, विक्रमगड १३०, सुधागड पाली ११०, माथेरान १००, भिवंडी, कल्याण ९०, ठाणे ८०, खालापूर, पनवेल ७, अंबरनाथ, उल्हासनगर ६०, पोलादपूर ५०, कणकवली ४० मिमी पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा, ओझरखेडा ६०, लोणावळा, महाबळेश्वर ५०, शहादा ३० मिमी पावसाची नोंद झाली़ मराठवाड्यातील अर्धापूर, घनसावगी, हिमायतनगर, परभणी, शिरपूर १० मिमी पाऊस झाला़ विदर्भात कोरची ५०, चिखलदरा, देवरी, सेलू ३०, आर्वी, कुरखेडा, मौदा, पारशिवनी २० मिमी पाऊस पडला़ घाटमाथ्यावर ताम्हिणी, लोणावळा ६०, डुंगरवाडी, कोयना (नवजा) ५० मिमी पाऊस झाला होता़.  

इशारा :

  •  १८ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. 
  • १९ सप्टेंबर रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता़. 
  • २० सप्टेंबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता़. 
  • २१ सप्टेंब रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 
  • १८ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात घाट परिसरातील तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार
  • पालघर, रायगड, जिल्ह्यात मुसळधार तर, ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड जिल्'ात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता. 
  • १९ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा
  • रायगड, पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, अहमदनगर, सातारा, परभणी, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़ . 
  • २० सप्टेंबरला पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार, धुळे, नंदूरबार, अहमदनगर, पुणे, सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़. 
टॅग्स :weatherहवामानRainपाऊस