Video: 'त्या' दोघींमध्ये ‘मनोमिलन’..! पुण्यात भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमधील वाद अखेर मिटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:29 IST2026-04-18T13:29:01+5:302026-04-18T13:29:25+5:30
भाजपच्या विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात महापालिकेत जोरदार वादावादी झाली होती

Video: 'त्या' दोघींमध्ये ‘मनोमिलन’..! पुण्यात भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमधील वाद अखेर मिटला
पुणे : भाजपच्या विद्यमान नगरसेविका आणि माजी नगरसेविकांमध्ये झालेला वाद तिऱ्हाईत व्यक्तींनी निर्माण केलेल्या गैरसमजातून झाला होता. आता दोन्ही बाजूंकडील गैरसमज दूर झाल्याने प्रकरण अखेर मिटल्याचा दावा सभागृह नेते गणेश बीडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
भाजपच्या विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आणि माजी नगरसेविका राजश्री काळे यांच्यात महापालिकेत जोरदार वादावादी झाली होती. या प्रकरणी चिमटे आणि काळे यांची एकत्र बैठक घेत गणेश बिडकर यांनी त्यांच्या मधील वाद मिटविला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गणेश बिडकर म्हणाले, दोन्ही नगरसेविका एकमेकींना फारशा परिचित नसल्यामुळे गैरसमज वाढला आणि त्यातून वाद झाला. मात्र आता तो पूर्णतः निवळला असून, या प्रकरणावर अधिक चर्चा होऊ नये. त्रयस्थ व्यक्तीमुळे हा वाद झाला. या वादाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशा सूचना केल्याचे बीडकर यांनी सांगितले.