Pune news: केसकर मृत्यू प्रकरणाला नवे वळण..! सरकारी उपचाराऐवजी नातेवाईकांकडूनच घेतले पैसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 11:32 IST2026-04-30T11:31:41+5:302026-04-30T11:32:13+5:30

Pune news - वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खर्च परत केल्याने संशय अधिक गडद; वरिष्ठांकडून गंभीर दखल

Pune news Shocking twist in Keskar's death case Money taken from relatives instead of government treatment | Pune news: केसकर मृत्यू प्रकरणाला नवे वळण..! सरकारी उपचाराऐवजी नातेवाईकांकडूनच घेतले पैसे?

Pune news: केसकर मृत्यू प्रकरणाला नवे वळण..! सरकारी उपचाराऐवजी नातेवाईकांकडूनच घेतले पैसे?

पुणे : केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील रंजना केसकर मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. रंजना केसकर यांच्या पोटात रक्तस्त्राव होऊ लागल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तत्काळ वरवंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही सर्व प्रक्रिया शासनामार्फत होणे अपेक्षित होते. मात्र, खासगी रुग्णालयात केसकर यांच्यावर करण्यात आलेल्या उपचाराचे पैसे केसकरांच्या नातेवाईकांना भरण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण उघडकीस येताच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी त्या नातेवाईकांचे पैसे परत केले.

दौंड तालुक्यातील केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान पोटात झालेल्या रक्तस्त्रावामुळे २२ वर्षीय रंजना केसकर या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. ही घटना घडल्यानंतर संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रजा घेतली. मात्र, हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच पुन्हा त्यांना कामावर हजर राहण्याचे मुख्यालयातून आदेश देण्यात आले. विशेष म्हणजे वरवंड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी रंजना केसकर यांना नेण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी खासगी रुग्णालयाचे नाममात्र शुल्क न भरल्याने तब्बल अर्धा ते पाऊण तास त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाही. हा सर्व प्रकार घडत असताना कडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी त्याच ठिकाणी होत्या. केसकर यांच्या नातेवाईकांनी इकडून तिकडून पैसे गोळा करून भरल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागताच खासगी रुग्णालयाने त्यांना पुण्याला नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कार्डियाक रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्याचे भाडेही केसकर यांच्या नातेवाईकांनाच द्यावे लागल्याचे समोर आले आहे.

नियमानुसार केडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासकीय खर्चातून पुढील कार्यवाही करणे गरजेचे होते मात्र, तसे काहीच झाले नाही. बुधवारी हा सर्व प्रकार उघडकीस येऊ लागल्यानंतर गोंधळलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केसकरांच्या नातेवाईकांचे खर्च झालेले ४० ते ४५ हजार रुपये पुन्हा देऊन टाकले यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

खासगी रुग्णालयातून डॉ. कदम यांचा यूटर्न
केसकर मृत्यू प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने बुधवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले. दरम्यान, वरवंड येथे खासगी रुग्णालयात केसकर यांना आणल्यानंतर डॉ. अनिल कदम हे त्याच परिसरातील कुटुंबनियोजनाच्या शिबिरामध्ये असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉ. कदम यांना याची माहिती दिली. त्यानंतर कदमही त्या ठिकाणी दाखल झाले. परिस्थिती पाहिली अन् थेट तेथून निघून गेल्याचा जबाब वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याचे समजते. 

Web Title : पुणे: केसकर की मौत ने लिया नया मोड़; रिश्तेदारों ने इलाज के लिए भुगतान किया?

Web Summary : खबर है कि सरकारी प्रक्रिया के दौरान जटिलताओं के बाद रंजना केसकर के परिवार को निजी अस्पताल में उनके इलाज के लिए भुगतान करने के लिए मजबूर किया गया। जांच के बीच अधिकारियों ने बाद में पैसे वापस कर दिए।

Web Title : Pune: Keskar death takes new turn; relatives paid for treatment?

Web Summary : Ranjana Keskar's family was allegedly forced to pay for her treatment at a private hospital after complications arose during a government-sponsored procedure. Officials later refunded the money amidst scrutiny.