शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Video: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती; नाशिक प्रकरणावरून अमित ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:57 IST

- हे ड्रग्स नेमके येतात कुठून? सरकारकडे याचे ठोस आकडे नाहीत का त्यांनी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याची गरज व्यक्त करत प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.

पुणे - महाराष्ट्रात वाढत चाललेल्या ड्रग्स तस्करीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यात आणि प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्सची विक्री सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी विचारले की, हे ड्रग्स नेमके येतात कुठून? सरकारकडे याचे ठोस आकडे नाहीत का त्यांनी पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याची गरज व्यक्त करत प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली.अमित ठाकरे पुढे म्हणाले की, शाळांच्या परिसरातही ड्रग्सची विक्री होत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. यावर कठोर कारवाई आणि कडक शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा हे प्रकार थांबणार नाहीत.. असे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक असल्यास मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.नाशिकमधील प्रकरणावर बोलताना अमित ठाकरे यांनी कंपन्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. सर्व कंपन्यांचे ऑडिट अनिवार्य केले पाहिजे. कोण काम करतं, त्याची पूर्ण माहिती प्रशासनाकडे असली पाहिजे, असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी अमित ठाकरे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेत माध्यमांशी बोलतांना म्हणाले, मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती.. एक कडक उदाहरण तयार झालं पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशा प्रकारचे गुन्हे करण्याचे धाडस करणार नाही. तसेच, पोलिसांना २४ तास फ्री हँड देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. पोलिसांना खरंच स्वातंत्र्य आहे का? असा सवालही त्यांनी माध्यमांशी बोलतांना उपस्थित केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Amit Thackeray demands death penalty for Nashik case accused.

Web Summary : Amit Thackeray strongly criticized the government over rising drug trafficking in Maharashtra. He questioned law and order, demanding strict action and a thorough audit of companies after the Nashik incident. He advocated for capital punishment for the accused to deter future crimes and urged giving police full autonomy.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNashikनाशिकPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAmit Thackerayअमित ठाकरेCrime Newsगुन्हेगारीTCS Nashik CaseTCS नाशिक केसPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण