शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis : गॅस सिलिंडर टंचाईचा भाजी खरेदीला ही 'ब्रेक';मार्केटयार्डात पालेभाज्या शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 11:22 IST

- गेल्या दोन दिवसांत अनेक हॉटेल व खानावळी बंद राहिल्याने मार्केटयार्डातून होणारी भाज्यांची खरेदी सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घसरली

पुणे : गॅस सिलिंडरच्या टंचाईचा परिणाम शहरातील हॉटेल आणि खानावळी व्यवसायावर होत असून त्याचा फटका मार्केटयार्डातील पालेभाज्यांना ही बसला आहे. गेल्या दोन दिवसांत अनेक हॉटेल व खानावळी बंद राहिल्याने मार्केटयार्डातून होणारी भाज्यांची खरेदी सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी घसरली आहे.

परिणामी गाळ्यांवर भाज्या शिल्लक राहू लागल्या असून तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनाही बसला असून नुकसान सहन करावा लागत आहे. परिणामी भाज्यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. मागणी कमी झाल्याने शेतकरी आणि विक्रेत्यांना आर्थिक फटका बसत असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

शहरातील हॉटेल, खानावळी, खाद्यपदार्थ विक्रेते, केटरिंग व्यावसायिक तसेच मंगल कार्यालयांतील स्वयंपाकी हे भाजीपाल्याचे प्रमुख ग्राहक मानले जातात. या व्यावसायिकांकडून दररोज मोठ्या प्रमाणात भाज्यांची खरेदी होते. काही जण थेट मार्केटयार्डातून खरेदी करतात, तर काही पुरवठादारांमार्फत माल घेतात. मात्र, गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल-खानावळींचे कामकाज मंदावले आहे. अनेक ठिकाणी व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे. 

गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अनेक हॉटेल आणि खानावळीचालकांनी भाज्यांची खरेदी कमी केली आहे. पालेभाज्या नाशवंत असल्याने त्यांची रोज विक्री करणे आवश्यक असते. त्यामुळे दर घसरले आहे. मार्केटयार्डात दररोज साधारण ७०-८० गाड्यांद्वारे आवक होते. सध्या मागणीत ३०-४० टक्क्यांनी घट झाली असल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही याचा फटका सहन करावा लागत आहे.  - विलास भुजबळ, ज्येष्ठ आडते, मार्केटयार्ड 

 

मार्केट यार्ड बाजारात विक्री न झालेला माल गाळ्यांवर शिल्लक राहत आहे. विविध भाज्यांच्या भावात घसरण झाली असून, गॅसपुरवठा सुरळीत न झाल्यास दरावर आणखी परिणाम होऊ शकतो. - राजेद्र सूर्यवंशी, तरकारी, आडते

English
हिंदी सारांश
Web Title : Gas Shortage Hits Vegetable Sales: Market Yard Faces Losses

Web Summary : Pune's gas cylinder shortage impacts hotels, causing a 30-40% drop in vegetable sales at Market Yard. Excess supply leads to 10-20% price decrease, hurting farmers and traders. Reduced demand, particularly for leafy greens, results in financial strain due to perishable goods.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईvegetableभाज्या