शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

Pune Nasrapur Case: 'ज्या ठिकाणी घटना घडली, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे', नराधमाच्या पत्नीचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 18:41 IST

Pune Nasrapur Case “तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या,” अशी मागणी मुलाने केली आहे

नसरापूर : महाराष्ट्र दिनी घडलेल्या बालिकेच्या हत्येनंतर संपूर्ण परिसर हादरला असताना, आरोपी भिमराव कांबळे (वय ६५, रा. साळवडे) याच्या कुटुंबीयांनीच त्याच्यावर तीव्र संताप व्यक्त करत कठोर शिक्षेची मागणी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आरोपीची पत्नी आणि मुलाने त्याच्याशी गेल्या १० वर्षांपासून कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

आरोपीच्या पत्नीने अत्यंत भावनिक प्रतिक्रिया देताना, “ज्या ठिकाणी घटना घडली, त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे,” असे म्हणत संताप व्यक्त केला. “मला ११ नातवंडं आहेत. त्या चिमुरडीच्या कुटुंबीयांना काय वेदना होत असतील, याची कल्पनाही करवत नाही. मी स्वतः आई आहे,” असे सांगताना त्या ढसाढसा रडल्या. गेल्या १० वर्षांपासून आरोपी घरापासून दूर असून त्याच्याशी कोणताही संपर्क नसल्याचे त्यांनी सांगितले.

“तो बाहेर काय करायचा, याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. घरात मात्र त्याने मुलींशी गैरवर्तन केले नाही,” असा दावा त्यांनी केला. मात्र, त्याच्यावर पूर्वी झालेले काही आरोप माहिती असल्याचेही त्यांनी मान्य केले.

दरम्यान, आरोपीच्या मुलानेही वडिलांच्या कृत्याचा तीव्र निषेध करत कठोर शब्दांत संताप व्यक्त केला. “तो माझा बाप आहे हीच माझी चूक आहे. त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या,” अशी मागणी त्याने केली. “त्या चिमुरडीला जितक्या वेदना झाल्या, तशाच वेदना त्यालाही झाल्या पाहिजेत,” असेही तो म्हणाला.

मुलाने पुढे सांगितले की, “पूर्वीही त्याने कुटुंबातील सदस्यांवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या होत्या. तेव्हा आम्हाला घर सोडून जावे लागले. त्यानंतर आमचा त्याच्याशी काहीही संबंध राहिला नाही.” कुटुंबीयांना दोष देऊ नये, अशी विनंतीही त्याने केली. या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरावर नोटीस लावून पुढील तपास सुरू केला असून, परिसरात संतापाचे वातावरण कायम आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Nasrapur Case: Accused's Wife Demands Public Execution for Heinous Crime

Web Summary : Family of the Nasrapur murder accused express outrage, demanding the harshest punishment. His wife and son disowned him years ago due to past abuse. They seek justice for the victim and family.
टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकFamilyपरिवारCourtन्यायालयWomenमहिला