Pune Crime: पुणे ग्रामीण भागातील उरळी कांचन परिसरात एक हादरवणारी घटना घडली आहे. व्यवसायाने वेल्डर असलेल्या एका व्यक्तीने आपल्याच पत्नीवर अमानुष अत्याचार केले. आरोपीने केवळ मारहाण करून न थांबता घरात असलेले फरशी साफ करायचे ॲसिड पत्नीच्या गुप्तांगावर ओतले. या गंभीर हल्ल्यानंतरही पतीने तिला उपचारासाठी रुग्णालयात जाऊ दिले नाही आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन घरातच डांबून ठेवले.
संशयाचे भूत डोक्यात आणि नराधमाचे कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, हा भयानक प्रकार २० एप्रिल रोजी घडला. आरोपी पतीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नीचे कोणासोबत तरी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. २० एप्रिल रोजी तो कामावरून घरी परतला आणि याच कारणावरून त्याने पत्नीशी वाद घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात त्याने तिला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर क्रूरतेची सर्व सीमा ओलांडत त्याने घरात ठेवलेले ॲसिड पत्नीच्या गुप्तांगावर ओतले.
उपचाराविना २५ दिवस मरणयातना आणि घरात कैद
ॲसिड पडल्यामुळे महिला वेदनेने विव्हळत होती, तिने पतीकडे हात जोडून रुग्णालयात नेण्याची भीक मागितली. मात्र, पतीला तिची दया आली नाही. जर हा प्रकार डॉक्टर, पोलीस किंवा इतर कोणाला सांगितला, तर तुकडे-तुकडे करून जीवे मारीन, अशी धमकी त्याने दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजात आणि पोलिसात आपले पाप उघड होईल या भीतीने त्याने तिला घरातच डांबून ठेवले आणि कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय उपचार मिळू दिले नाहीत.
सोलापूरला पळून जात वाचवला जीव, २५ दिवसांनी गुन्हा दाखल
अशा नरकयातना सहन करत पीडितेने तब्बल २५ दिवस काढले. अखेर मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पतीची नजर चुकवून तिने तिथून पळ काढला आणि सोलापूर जिल्ह्यातील आपल्या माहेरचे घर गाठले. माहेरी पोहोचल्यावर तिने रडत-रडत आई-वडिलांना आपल्यावर झालेला हा अमानुष अत्याचार सांगितला. त्यानंतर ही महिला पुन्हा उरळी कांचन येथे परतली आणि तिने १५ मे रोजी थेट पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध अधिकृत तक्रार नोंदवली.
आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. महिलेला गंभीर जखमा झाल्या असल्याने तिला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Web Summary : In Pune, a husband poured acid on his wife's genitals, suspecting infidelity. He held her captive for 25 days, threatening death if she spoke. The woman escaped to her parents, reported the crime, and is now hospitalized.
Web Summary : पुणे में, एक पति ने व्यभिचार के संदेह में अपनी पत्नी के गुप्तांगों पर एसिड डाला। उसने उसे 25 दिनों तक बंदी बनाकर रखा और बोलने पर जान से मारने की धमकी दी। महिला भागकर अपने माता-पिता के पास गई, अपराध की सूचना दी और अब अस्पताल में है।