शहरं
Join us  
Trending Stories
1
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
2
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
3
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
4
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
5
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
7
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
8
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
9
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
10
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
11
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
12
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
13
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
14
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
15
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
16
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
17
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
18
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
19
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
20
​मुख्यमंत्र्यांचा उल्लेख 'जॉन अब्राहम' म्हणून करत, अमित ठाकरेंची व्हीआयपी संस्कृतीवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

हल्लेखोरांनी कुटुंबावर केला जीवघेणा हल्ला; तरुणाचा मृत्यू, आई-वडील, बहीण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:16 IST

११ वाजण्याच्या सुमारास तीन चड्डी-बनियनधारी हल्लेखोरांनी घरात घुसून कुटुंबावर बेदम मारहाण

पुणे -  यवत स्टेशन रोडवरील नीलकंठेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या शशिकांत चव्हाण यांच्या घरात मध्यरात्री घडलेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काल (दि. ५) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तीन चड्डी-बनियनधारी हल्लेखोरांनी घरात घुसून कुटुंबावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अविनाश ऊर्फ विश्वजीत शशिकांत चव्हाण याचा मृत्यू झाला असून, शशिकांत चव्हाण, प्राची यादव आणि उज्वला चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेचा थरार

हल्लेखोरांनी प्रथम घराबाहेर आलेल्या अविनाश चव्हाण याच्यावर हल्ला केला. त्यानंतर घरात घुसून कुटुंबातील तिघांवर अमानुष मारहाण करण्यात आली. मात्र, मयत अविनाश याची पत्नी सारीका चव्हाण हिने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह बाथरूममध्ये लपून जीव वाचवला. तिने तत्काळ शेजाऱ्यांना मदतीसाठी हाक दिली.

शेजारी अरुण मुळीक व संतोष मुळीक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या चाहुलीने हल्लेखोर पळून गेले. यानंतर दीपक मुळीक, लक्ष्मण मुळीक, प्रणव मुळीक आणि कुमार मुळीक यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पसार झाले.

पोलीस तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस आणि पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत श्वानपथक (डॉग स्क्वॉड) पाचारण केले आहे. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की त्यामागे काही अन्य कटकारस्थान आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे यवत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक