पुण्यात प्रवासी भरण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; थेट पुलावरून खाली फेकले, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:21 IST2026-05-19T14:16:16+5:302026-05-19T14:21:46+5:30

पुण्यात जुन्या कारणावरुन झालेल्या हाणामारीत आरोपींनी रिक्षाचालकाला पुलावरुन खाली फेकल्याची घटना समोर आली.

Pune Crime Auto Driver Brutally Attacked Over Passenger Dispute in Katraj 3 Arrested | पुण्यात प्रवासी भरण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; थेट पुलावरून खाली फेकले, तिघांना अटक

पुण्यात प्रवासी भरण्याच्या वादातून रिक्षाचालकावर जीवघेणा हल्ला; थेट पुलावरून खाली फेकले, तिघांना अटक

Pune Crime: पुण्यातील कात्रज ते नवले ब्रिज महामार्गावर सोमवारी सकाळी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली. प्रवाशांची ने-आण करण्याच्या जुन्या कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले. तीन रिक्षाचालकांनी मिळून आपल्याच एका सहकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला आणि त्यानंतर त्याला थेट पुलावरून खाली फेकून दिले. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरज माणिक काळे (३०) हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. दोन ते तीन वर्षांपूर्वी प्रवाशांना रिक्षात बसवण्यावरून सुरज यांचे अन्य रिक्षाचालकांशी खटके उडाले होते. याच जुन्या वादाची खुन्नस मनात ठेवून सोमवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास दत्तनगर चौकात आरोपींनी सुरज यांना गाठले.

तिघा आरोपींनी सुरज यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी आपल्या जवळील धारदार हत्याराने सुरज यांच्यावर सपासप वार केले. एवढ्यावरच न थांबता, या तिघांनी गंभीर जखमी झालेल्या सुरज यांना राजमाता भुयारी मार्गाच्या वरून थेट खाली फेकून दिले.

व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांकडून अटक

या संपूर्ण मारहाणीचा आणि हल्ल्याचा एक थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओ समोर येताच पुणेपोलिसांची घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत मुख्य आरोपी बापूसो बाळासाहेब भोसले, गणेश हरिभाऊ धारपले, आणि गणेश उर्फ भावड्या हरिभाऊ धरपाळे या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी भोर आणि वेल्हा परिसरात विशेष पथके रवाना केली होती.

जखमी चालकावर रुग्णालयात उपचार सुरू

या भीषण हल्ल्यात सुरज काळे हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर त्यांना तातडीने धनकवडी येथील भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आंबेगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
 

Web Title : पुणे: यात्री विवाद में ऑटो चालक पर हमला, पुल से फेंका; तीन गिरफ्तार

Web Summary : पुणे में यात्री विवाद में सूरज काले नामक एक ऑटो चालक पर हमला किया गया। तीन हमलावरों ने उसे चाकू मारा और पुल से नीचे फेंक दिया। पुलिस ने तीनों को गिरफ्तार कर लिया है। काले गंभीर रूप से घायल हैं।

Web Title : Pune: Auto driver attacked over passenger dispute, thrown off bridge.

Web Summary : In Pune, a passenger dispute led to a brutal attack on an auto driver, Suraj Kale. Three assailants stabbed him and threw him off a bridge. Police arrested all three involved. Kale is hospitalized with serious injuries.