शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

स्वबळावर की युतीत लढायचे याविषयी स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ

By विश्वास मोरे | Updated: September 21, 2025 16:32 IST

अजित पवार म्हणाले, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. त्यासाठी आम्हीही तयारी करत आहोत.

पिंपरी : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. आम्हीही तयारी करत आहोत, महायुती सक्षम करण्याकडे आमचा प्रयत्न आहे, निवडणुका जाहीर झाल्यावर स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊ, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी मांडली.राष्ट्रवादी काँग्रेस परिवार मिलन कार्यक्रमासाठी पिंपरीत आले असताना पवार पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत. त्यासाठी आम्हीही तयारी करत आहोत. त्यासाठी दोन दिवस शहरातील परिवार मिलन कार्यक्रमांना उपस्थिती लावली. जनसंवादच्या माध्यमातून प्रश्न जाणून घेतले. प्रशासनाशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावले. कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेतल्या. तसेच महायुती सक्षम करण्याकडे आमचा प्रयत्न आहे.' मी जोतिषी नाही महापालिका निवडणुका अगोदर कि जिल्हा परिषद निवडणूक अगोदर होणार? असे विचारले असता, पवार म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही. ते निवडणूक आयोग ठरवेल. निवडणुकांना स्वबळावर लढायचे की नाही, याबाबत निवडणुका जाहीर झाल्यावर स्थानिक पातळीवर नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी आणि सर्वांशी चर्चा केली जाईल. परिस्थिती पाहून वरिष्ठ पातळीवर पक्ष आणि कार्यकर्ते हिताचा निर्णय घेतला जाईल.' ठोकशाही केली जाऊ नयेगुणरत्न सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत अजित पवार म्हणाले, 'अशा घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत, ठोकशाही केली जाऊ नये.' मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी दसऱ्याका अल्टिमेटम दिला आहे, असे विचारल्यावर पवार म्हणाले, 'कोणत्याही वर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ज्या मागण्या आहेत, त्या कायद्याच्या चौकटीत बसवत न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.' तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे अजित पवार यांची उद्धव बाळासाहेब ठाकरें गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या पत्नी उषा वाघेरे आणि मुलगा ऋषीकेश वाघेरे यांनी भेट घेतली. त्यानंतर संजोग वाघेरे पक्षात येणार का? या प्रश्नावर पवारांनी मिश्किल उत्तर दिले. पवार म्हणाले, 'संजोग उबठामध्ये आहे. उषा आमच्याबरोबर आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. संजोगला विचारसरणी पटली म्हणून तो तिकडे आहे. उषाला आमची विचारसरणी पटली. म्हणून त्या माझ्याबरोबर आहेत. अनेकांच्या घरात अशीच स्थिती आहे. अगदी आमच्यासहित खूप उदाहरण देता येतील.' या उत्तरावर एकच हशा पिकला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2024