शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

एकाला वाचवण्यासाठी दुसरा पाण्यात उतरला; तळ्यात बुडून २ चिमुकल्यांचा मृत्यू, जुन्नर तालुक्यातील हृदयद्रावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 17:31 IST

योग्य संरक्षणभिंत, चेतावणी फलक व देखरेख व्यवस्था असती, तर ही घटना टाळता आली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली

ओतूर : जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी परिसरात मंगळवार, दि. २१ एप्रिल रोजी दुपारी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत दोन निरागस मुलांचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावाच्या उत्तरेकडील भागात एका तळ्याला कंपाउंड करण्याचे काम सुरू होते; मात्र हे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने तळ्याभोवती कोणतीही सुरक्षितता व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. अंदाजे ५० फूट खोल पाणी असलेल्या या तळ्यात दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

सोहम जयसिंग नवले (वय १२) हा मुलगा प्रथम तळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी विघ्नेश महेश पवार (वय ८) रा. बल्लाळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) हा दुसरा मुलगाही तळ्यात उतरला. मात्र पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. ही घटना कार्तिक नवले याने पाहताच त्याने तत्काळ घरी जाऊन माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने शोधकार्य सुरू केले. सुमारे १५ मिनिटांच्या प्रयत्नानंतर सोहमला बाहेर काढण्यात आले, तर विघ्नेशचा शोध घेत तब्बल दोन तासांनी त्याला पाण्याबाहेर काढण्यात रेस्क्यू टीम यश आले.    दोन्ही मुलांना तातडीने रेस्क्यू पथक व पोलिसांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत गोरे यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी प्रवीण संपोंगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी ओतूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. संबंधित तळ्याची जागा डॉ. विनोद ढवळे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपूर्ण काम व सुरक्षा उपाययोजनांचा अभाव यामुळे ही दुर्घटना घडल्याची चर्चा गावकऱ्यांतून होत आहे. योग्य संरक्षणभिंत, चेतावणी फलक व देखरेख व्यवस्था असती, तर ही घटना टाळता आली असती, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

घटनेच्या पार्श्वभूमीवर सरपंच संजय नायकोडी, सामाजिक कार्यकर्ते सुधीर महाराज घोलप आणि ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक प्रभारी अधिकारी प्रवीण संपोंगे यांनी नागरिकांना आवाहन केले की उन्हाळी सुट्टीत मुले बाहेर खेळायला जात असल्याने पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवावे. तळी, विहिरी, ओढे किंवा बांधकाम सुरू असलेल्या धोकादायक ठिकाणी मुलांना एकटे जाऊ देऊ नये. तसेच ग्रामस्थांनीही सुरक्षा उपाययोजना करून चेतावणी फलक लावावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tragedy in Junnar: Two Children Drown in Pond While Rescuing Each Other

Web Summary : Two boys drowned in a Junnar pond while trying to save each other. Soham Navale, 12, fell in, and Vignesh Pawar, 8, attempted a rescue. Both tragically died. Incomplete safety measures at the pond contributed to the accident.
टॅग्स :PuneपुणेJunnarजुन्नरDeathमृत्यूSwimmingपोहणेWaterपाणीSocialसामाजिकFamilyपरिवार