Rajasthan Royals to win over Punjab Kings : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी, यशस्वी जैस्वालचे दमदार अर्धशतक आणि अखेरच्या षटकात फरेरा आणि इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात शुभम दुबेनं केलेल्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने घरच्या मैदानात खेळणाऱ्या पंजाब किंग्सचा विजयरथ रोखून दाखवला. न्यू चंडीगडच्या मैदानात पहिल्यांदा फलंदाजी करताना पंजाब किंग्सच्या संघाने प्रभसिमरन सिंग आणि मार्कस स्टॉयनिसच्या अर्धशतकाच्या जोरावर ४ विकेट्सच्या मोबदल्यात निर्धारित २० षटकात २२२ धावा केल्या होत्या. या मैदानातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं ६ विकेट्स आणि ४ चंडू राखून विक्रमी विजय नोंदवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
प्रभसिमरनसह मार्कस स्टॉयनिसचं वादळी अर्धशतक
नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजीची वेळ आल्यावर प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन जोडीनं पंजाबच्या संघाला दमदार सुरुवात करुन दिली. पण तिसऱ्या षटकात प्रियांश आर्यच्या रुपात जोफ्रा आर्चरनं ३७ धावांवर पंजाबला पहिला धक्का दिला. त्याने ११ चेंडूत २९ धावांची खेळी केली. कूपर कॉलॉनी ३० (१४) आणि श्रेयस अय्यर ३० (२७) उपयुक्त खेळी करुन परतल्यावर प्रभसिमरन सिंग ४४ चेंडूत ५९ धावांची खेळी साकारली. अखेरच्या षटकात मार्कस स्टॉयनिस याने २२ चेंडूत नाबाद ६२ धावांची खेळी करत पंजाबच्या धावफलकावर ४ बाद २२२ धावा लावल्या. राजस्थानकडून यश राज पुंजा याने सर्वाधिक २ तर जोफ्रा आणि नांद्रे बर्गरनं प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
वैभव-यशस्वीचा धमाका, फरेरा-दुबे जोडीनं दिला फिनिशिंग टच
या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीनं १६ चेंडूत ४३ धावांच्या खेळीसह राजस्थानच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. यशस्वी जैस्वाल २७ चेंडूत ५१ धावांचे योगदान दिले. ध्रुव जुरेल २० चेंडूत १६ आणि कर्णधार रियान पराग १६ चेंडूत २९ धावांची खेळी करून परतल्यावर राजस्थानचा संघ धावांचा पाठलाग करताना अडचणीत सापडल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण डेव्हॉन फरेरा आणि इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात मैदानात उतरलेल्या शुभम दुबेनं सामना राजस्थानच्या बाजूनं वळवला. फरेरानं २६ चेडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. याशिवाय शुभम दुबेनं १२ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकाराच्या मदीने नाबाद ३१ धावांची खेळी केली. पंजाबकडून गोलंदाजीत युझवेंद्र चहलनं सर्वाधिक ३ तर अर्शदीप सिंगने १ विकेट आपल्या खात्यात जमा केली.
Web Summary : Vaibhav, Jaiswal's fifties, and Ferreira-Dube's finish powered Rajasthan to a record chase against Punjab's 222. Prabhsimran and Stoinis scored half-centuries for Punjab, but Rajasthan won by 6 wickets.
Web Summary : वैभव, जायसवाल के अर्धशतक और फरेरा-दुबे की फिनिशिंग से राजस्थान ने पंजाब के 222 रनों के लक्ष्य को पार किया। प्रभसिमरन और स्टोइनिस ने पंजाब के लिए अर्धशतक बनाए, पर राजस्थान 6 विकेट से जीता।