शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 20:14 IST

अंदाजानुसार, मंगळवारीच विदर्भातील बहुतेक जिल्ह्यावर अवकाळीचे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे तापमानात किंचित घट झाली, पण अनेक दिवसांपासून तीव्र ताप सहन करणाऱ्या जिल्ह्यांना त्यातून काहीच दिलासा मिळाला नाही. ४६ अंशाच्या वर गेलेल्या तीन जिल्ह्यात तापमान ४५ वर आले आणि नागपूरसह चार जिल्ह्यात ४४ अंशाच्या वर तापमानाची नाेंद झाली.

नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याप्रमाणे विदर्भातही काही जिल्ह्यात आकाश अवकाळीच्या ढगांनी व्यापले आहे. २९ एप्रिल ते १ मे या काळात ४० ते ५० किमी वेगाने वाहणारे वादळी वारे, विजांचा कडकडाट व ढगांच्या गर्जनेसह काही ठिकाणी तुरळक व गारपीटीचा पाऊस हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमान २ ते ३ अंशाने घटून उकाड्याचा त्रास किंचित कमी हाेईल, असा अंदाज आहे.अंदाजानुसार मंगळवारीच विदर्भातील बहुतेक जिल्ह्यावर अवकाळीचे ढग जमा झाले आहेत. त्यामुळे तापमानात किंचित घट झाली, पण अनेक दिवसांपासून तीव्र ताप सहन करणाऱ्या जिल्ह्यांना त्यातून काहीच दिलासा मिळाला नाही. ४६ अंशाच्या वर गेलेल्या तीन जिल्ह्यात तापमान ४५ वर आले आणि नागपूरसह चार जिल्ह्यात ४४ अंशाच्या वर तापमानाची नाेंद झाली.साेमवारपर्यंत अकाेला, अमरावती, वर्धा जिल्ह्यातील तापमान ४६ अंशावर हाेते, ज्यात २४ तासात एक ते दीड अंशाची घट झाली व तापमान अनुक्रमे ४५.२ व ४५ अंशावर खाली आले. दुसरीकडे मंगळवारी नागपूरला ४४.४ अंश, चंद्रपूर ४४.८ अंश आणि गडचिराेली व यवतमाळ येथे ४४ अंशाची नाेंद झाली. वाशिम आणि ब्रम्हपुरीत ४३ च्यावर आणि इतर जिल्ह्यामध्ये पारा ४२ अंशाच्या वर आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव शहराचा पारा विदर्भातील उष्ण शहरांप्रमाणे ४४ अंशावर हाेता. आकाशातील ढग व आर्द्रतायुक्त वातावरणामुळे या तापमानाची तीव्रता अधिक जाणवत हाेती. मात्र कुठेही पावसाची नाेंद झाली नाही.पावसाळी वातावरणामुळे १ मे पर्यंत कमाल तापमानात २ ते ३ अंशाची घट हाेईल आणि त्यानंतर ते पुन्हा वाढेल असा वेधशाळेचा अंदाज आहे.

टॅग्स :nagpurनागपूरHeatwaveउष्णतेची लाटRainपाऊस