शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 19:57 IST

Government on Petrol Diesel Prices : महत्वाचे म्हणजे, सरकारचे हे स्पष्टीकरण मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावाने जागतिक तेल बाजारपेठेत अस्थिरता असताना आले आहे.

Petrol Diesel Price : देशातील काही राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका बुधवारी संपत आहेत. असे असतानाच, सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र, आता केंद्र सरकारने या सर्व चर्चांना अथवा अंदाजांना पूर्णविराम दिला आहे. उद्या निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतरही इंधन दरवाढीची कोणतीही योजना नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे. महत्वाचे म्हणजे, सरकारचे हे स्पष्टीकरण मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावाने जागतिक तेल बाजारपेठेत अस्थिरता असताना आले आहे.

यासंदर्भात बोलताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले, "देशात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध आहे. कुठल्याही प्रकारच्या दरवाढीचे नियोजन नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. काही ठिकाणी नागरिक भीतीपोटी आगाऊ इंधन खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आपण राज्य सरकारांच्या संपर्कात आहोत."

सुजाता शर्मा यांनी माहिती दिली की, तेल कंपन्या सध्या पेट्रोलवर प्रति लिटर २० रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर १०० रुपयांचा तोटा सहन करत आहेत, तरीही कोणत्याही टंचाईविना पुरवठा करण्याला प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशात इंधन टंचाईच्या भीतीने सोमवारी पेट्रोल पंपांवर लांबच्या लांब रांगा दिसून आल्या. याची दखल घेत मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी तेल कंपन्या आणि अधिकाऱ्यांना पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

घरगुती एलपीजी आणि पीएनजी ग्राहकांसाठी १००% पुरवठा सुनिश्चित -शर्मा पुढे म्हणाल्या, पश्चिम आशियातील संकटामुळे कच्चे तेल, एलपीजी आणि पाईप गॅसच्या (PNG) आयातीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र असे असले तरी, सरकारने उपाययोजना म्हणून आवश्यक पावलेही उचलली आहेत. घरगुती एलपीजी आणि पीएनजी ग्राहकांसाठी १००% पुरवठा सुनिश्चित करण्यात आला आहे. याशिवाय, वाहतुकीसाठी वापरला जाणारा सीएनजीही सुरळीत आहे. व्यावसायिक एलपीजी पुरवठाही आता अंदाजे ७०% पर्यंत पूर्ववत झाला आहे. याच बरोबर, औषधनिर्माण, पोलाद, बियाणे आणि कृषी यांसारख्या अत्यावश्यक उद्योगांनाही प्राधान्य दिले जात आहे, जेने करून कुठल्याही प्रकारची मोठी समस्या निर्माण होणार नाही.

 

English
हिंदी सारांश
Web Title : No Petrol-Diesel Price Hike After Elections: Government Clarifies Concerns

Web Summary : The government denies post-election fuel price hikes despite Middle East tensions. Ample LPG, petrol, and diesel stocks are available; citizens shouldn't panic. Oil companies are prioritizing supply despite losses. Domestic LPG, PNG supply is 100% ensured, and CNG is smooth.
टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढCentral Governmentकेंद्र सरकारPetrolपेट्रोलDieselडिझेल