Join us
Daily Top 2Weekly Top 5

PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता

दोन निर्धाव चेंडू खेळल्यावर वैभव सूर्यवंशीनं षटकार मारत उघडलं खाते, अन्...

By सुशांत जाधव | Updated: April 28, 2026 22:18 IST

Open in App

न्यू चंडीगडच्या मैदानात पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाकेदार शो पाहायला मिळाला. पंजाब किंग्सनं दिलेल्या २२३ धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल याने एकेरी धाव घेत अर्शदीप सिंगच्या पहिल्याच षटकात वैभव सूर्यवंशीला स्ट्राईक दिले. टी-२० क्रिकेटमधील भारताचा नंबर वन गोलंदाज असलेल्या अर्शदीप सिंगने अचूक टप्प्यावर यॉर्करचा मारा करत वैभव सूर्यंवशीला सलग दोन चेंडू निर्धाव टाकले. पण त्यानंतर वैभव सूर्यवंशीनं टप्पा चुकताच अर्शदीपची धुलाई सुरु केली. षटकारासह खाते उघडत अखेरच्या दोन चेंडूवर त्याने २ चौकार मारत पहिल्या पाच चेंडूत १४ धावा कुटल्या. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवरही तो तुटून पडला

दुसऱ्या षटकात वैभव सूर्वंशीनं यंदाच्या हंगामात पंजाब किंग्सकडून पहिला सामना खेळणाऱ्या लॉकी फर्ग्युसनची धुलाई केली. या षटकात षटकात एक चौकार आणि २ षटकारासह तो अवघ्या १० चेंडत ३० धावांवर पोहचला.  तिसऱ्या षटकात मार्को यान्सेनच्या गोलंदाजीवर एक चौकारासह आणखी एक उत्तुंग षटकार मारत वैभवनं यंदाच्या हंगामातील आणखी एका अर्धशतकाच्या जवळ पोहचला.

PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)

अर्धशतक हुकलं, पण...

अर्शदीप सिंगनं आणखी एक उत्तुंग षटकार खाल्ल्यावर वैभवला लो फुलटॉस चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरनं त्याचा झेल टिपला. वैभव सूर्यवंशीनं १६ चेंडूत ३ चौकार आणि ४५ षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. त्याचे अर्धशतक अवघ्या ७ धावांनी हुकलं असले तरी संघाला दमदार सुरुवात करुण देण्यासोबतच यंदाच्या हंगामात ४०० धावांचा आकडा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. यासह त्याने ऑरेंज कॅपही पटकवाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhav Sooryavanshi shines, Arshdeep strikes back in PBKS vs RR.

Web Summary : Vaibhav Sooryavanshi's explosive start for RR against PBKS saw him smash Arshdeep before falling to a full toss. He scored 43 off 16, missing his fifty but becoming the first to 400 runs this season and claiming the Orange Cap.
टॅग्स :आयपीएल २०२६पंजाब किंग्सराजस्थान रॉयल्सअर्शदीप सिंगवैभव सूर्यवंशी