शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 22:28 IST

खरेतर, विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी आता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने ५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. महत्वाचे म्हणजे, भाजपने यावेळीही धक्कातंत्राचा वापर केला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

यांना मिळाली संधी? -खरेतर, विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील अनेकांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपाने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर केला आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली. भाजपने मंगळवारी जारी केलेल्या या यादीत, सुनील विनायक कर्जतकर (Sunil Vinayak Karjatkar), माधवी नाईक (Madhavi Naik), संजय नत्थूजी भेंडे (Sanjay Natthuji Bhende), विवेक बिपिनदादा कोल्हे (Vivek Bipindada Kolhe) आणि प्रमोद शांताराम जठार (Pramod Shantaram Jathar) यांचा समावेश आहे.

तत्पूर्वी, राज्य भाजपने साधारणपणे ३० जणांची यादी पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठांकडे पाठवली होती. यानंतर, वरिष्ठांकडून ही यादी छोटी करून मागण्यात आली होती. यानतंर आता या पाच नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. याशिवाय, विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

कोण आहेत हे नेते? -सुनील कर्जतकर हे भाजपचे संघटन मंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. संजय भेंडे हे नागपूर नागरिक सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत आणि भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत. माधवी नाईक या ठाण्याच्या असून भाजपच्या महामंत्री आहेत. प्रमोद जठार हे कोकणातील कणकवली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. तर कोपरगावचे विवेक कोल्हे हे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत. 

या आमदारांचा कार्यकाळ संपणार -येत्या १३ मे २०२६ रोजी विधान परिषदेचा कार्यकाळ संपत असलेल्या ९ सदस्यांमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड (भाजप) आणि प्रवीण दटके यांचा समावेश आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम -निवडणुकीची अधिसूचना जारी करणे – २३ एप्रिल, २०२६ (गुरुवार)उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)उमेदवारी अर्जांची छाननी – २ मे, २०२६ (शनिवार)उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – ४ मे, २०२६ (सोमवार)मतदानाचा दिनांक – १२ मे, २०२६ (मंगळवार)मतदानाची वेळ – सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० पर्यंतमतमोजणी (निकाल) – १२ मे, २०२६ (मंगळवार) सायंकाळी ०५:०० वाजतानिवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक – १३ मे, २०२६ (बुधवार)

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Announces List of 5 for Legislative Council Elections

Web Summary : BJP announced five candidates for the Maharashtra Legislative Council elections, surprising many by choosing new faces. Sunil Karjatkar, Madhavi Naik, Sanjay Bhende, Vivek Kolhe, and Pramod Jathar are on the list. The election for nine council seats is scheduled for May 12, 2026.
टॅग्स :BJPभाजपाVidhan Parishadविधान परिषदElectionनिवडणूक 2026