शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 22:56 IST

"एक साधरण भेटी होती राजकीय भेट नव्हती, छत्रपती संभाजीनगरला उद्योग विभागाच्या कार्यक्रमाला आलो होतो. राजकारणापलीकडे मनोज दादाचे  अन् माझे संबंध आहेत. सकाळी ७:३० वाजता विमान असल्याने गप्पा कोणाबरोबर मारायच्या म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलो. त्यांच्या सोबत मनसोक्त गप्पा मारल्या."

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी सायंकाळी अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली. मंत्री उदय सामंत हे अंतरवाली  सराटी येथील सरपंच यांच्या मळ्यात दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याचे समजते मात्र भेटी मागचे कारण काय? दोघांमध्ये काय चर्चा झाली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.महत्वाचे म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच जरांगे पाटील यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आज उदय सामंत यांनी अचानक जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मात्र, या भेटी मागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, "मनोज जरांगे पाटील यांचे आणि माझे राजकारणा पलीकडचे संबंध आहेत. मनसोक्त गप्पा मारण्यासठी आलो होतो," असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले उदय सामंत - "एक साधरण भेटी होती राजकीय भेट नव्हती, छत्रपती संभाजीनगरला उद्योग विभागाच्या कार्यक्रमाला आलो होतो. राजकारणापलीकडे मनोज दादाचे  अन् माझे संबंध आहेत. सकाळी ७:३० वाजता विमान असल्याने गप्पा कोणाबरोबर मारायच्या म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलो. त्यांच्या सोबत मनसोक्त गप्पा मारल्या. मराठा उप समितीमध्ये मी सदस्य आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काय चालू आहे ते देखील त्यांना सांगितले. मनोज  जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून ज्या काही अपेक्षा व्यक्त केल्या आहे. त्यांवर सविस्तर चर्चा झाली. मराठा आरक्षणासंदर्भातील सकारात्मक बाजू सांगितली असून त्यात काय त्रुटी आहेत, हेही सांगितले. हे उद्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मी मांडेल" असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Minister Uday Samant Meets Manoj Jarange; Hour-Long Discussion in Antarwali

Web Summary : Minister Uday Samant met Maratha activist Manoj Jarange Patil in Antarwali Sarati. They discussed Maratha reservation expectations and current status. Samant emphasized the meeting was personal, not political, and he would present Jarange's concerns in the upcoming cabinet meeting.
टॅग्स :Uday Samantउदय सामंतManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणShiv Senaशिवसेना