नांदेड : शहरातील श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळ परिसरात एक गूढ गोलाकार वस्तू आकाशात उडताना दिसल्याने नागरिकांमध्ये उत्सुकतेसोबतच चर्चेला उधाण आले आहे. ही घटना एका जागरूक नांदेडकराने मोबाईल कॅमेरात कैद केली असून, सदर व्हिडिओमुळे विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुशील शेळके हे सांगवी येथील विमानतळालगत असलेल्या ट्रॅकवर मंगळवारी, दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या नजरेस आकाशात एक गोलाकार वस्तू उडताना दिसली. विशेष म्हणजे ही वस्तू आकाराने आणि हालचालीच्या पद्धतीने विमानांपेक्षा पूर्णतः वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले.विमानतळ परिसरातून दररोज अनेक विमानांची ये-जा सुरू असते. मात्र सदर वस्तू विमानासारखी नसून गोलाकार आणि स्थिरतेने तरंगत असल्यासारखी दिसत होती. त्यामुळे ही उडती तबकडी (UFO) आहे की एखादा साधा हवेत सोडलेला बलून, याबाबत कुतूहल निर्माण झाले आहे. दरम्यान, विमानतळ परिसर हा अत्यंत संवेदनशील मानला जातो. येथे ड्रोन किंवा इतर कोणतेही कृत्रिम उड्डाण करणारे साधन उडविण्यास सक्त मनाई आहे. अशा परिस्थितीत या परिसरात दिसून आलेली ही अज्ञात वस्तू नेमकी काय होती, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 00:57 IST
मिळालेल्या माहितीनुसार, सुशील शेळके हे सांगवी येथील विमानतळालगत असलेल्या ट्रॅकवर मंगळवारी, दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या नजरेस आकाशात एक गोलाकार वस्तू उडताना दिसली. विशेष म्हणजे ही वस्तू आकाराने आणि हालचालीच्या पद्धतीने विमानांपेक्षा पूर्णतः वेगळी असल्याचे त्यांनी सांगितले.
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}