...तर Modi जी सुद्धा म्हणतील, मैं Sanjay Raut के घर के सामने रहता हुँ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 04:44 PM2021-09-26T16:44:54+5:302021-09-26T16:45:02+5:30

महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. त्यासाठी तयारीला लागा. भविष्यकाळ शिवसेनेचा आहे, असा कानमंत्रही दिला

narendra modi will also say I live in front of Sanjay raut house | ...तर Modi जी सुद्धा म्हणतील, मैं Sanjay Raut के घर के सामने रहता हुँ!

...तर Modi जी सुद्धा म्हणतील, मैं Sanjay Raut के घर के सामने रहता हुँ!

Next
ठळक मुद्देप्रत्येकाने एक नगरसेवक निवडून आणला तरी पिंपरी - चिंचवड महापालिकेत शिवसेनेची सत्ता

पुणे : शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी शिरुर लोकसभा आणि पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना पक्ष कमी पडला, पक्ष बांधणी झाली नाही, असे म्हणणे योग्य नाही. येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. त्यासाठी तयारीला लागा. भविष्यकाळ शिवसेनेचा आहे, असा कानमंत्रही दिला. यावेळी संजय राऊत यांनी दिल्लीतला पत्ता सांगताना मी नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहतो, असं सांगितलं.

राऊत म्हणाले, मी अनेक वर्ष दिल्लीत राहतो. नरेंद्र मोदी माझ्या समोर राहतात असा नेहमी पत्ता सांगतो. ही शिवसेनेची कृपा आहे. देशाची राजधानी इतकी मोठी तिथं लोकं आपल्यालाला ओळखतात. मी सांगतो नरेंद्र मोदीजी के सामने रहता हूं, अगर उनको पुछोगे नरेंद्र मोदी को तो वह कहेंगे मै संजय राऊत के सामने रहता हूं, असं सजंय राऊत मिश्किलपणे म्हणाले.

 ''पुणे, पिंपरी - चिंचवड महापालिकांमध्ये भगवा फडकत नाही, याची खंत वाटते. शिवसेनेचे खासदार - आमदार निवडून येतात, पण महापालिका निवडणुकीत फुगा फुटतो. मागील निवडणुकीत चारच्या पॅनेल होते म्हणून पराभव झाला असे म्हणणे योग्य नाही. आपला पाया ढेपाळला होता, संघटनात्मक बांधणी कमकुवत होती, हे मान्य करायला हवे. मागील निवडणुकीत झालेल्या चुका यंदा होता कामा नये. महाविकास आघाडी होईल का नाही, झाली तर काय, नाही झाली तर काय, या भानगडीत पडू नका. निवडणुका एकट्याच्या जीवावर लढायची सवय आपल्याला आहे. सगळया जागांवर स्वबळावर लढायची आपली तयारी आहे. मात्र, स्वाभिमान सोडून, भगव्या झेंड्याशी तडजोड करुन आघाडी होणार नाही. आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्याशिवाय, असे शिवसेनेचे धोरण आहे. असंही ते म्हणाले आहेत.''

प्रत्येकाने एक नगरसेवक निवडून आणला तरी पिंपरी - चिंचवड महापालिकेत शिवसेनेची सत्ता

शिवसेना गेल्या पन्नास वर्षापासून समाजकारणात - राजकारणात आहे. शिवसेनेने अनेक स्थित्यंतरे पाहिली. तरुण - युवा पिढी जोडली गेल्याने नव्या उमेदीने, ताकदीने पक्षविस्तार झाला.पक्ष वाढीसाठी नवीन चेहेऱ्यांची गरज आहे. स्वत:चा विचार करताना पक्षाचाही विचार केला पाहिजे. पक्ष वाढला की सन्मान - प्रतिष्ठा आपोआप वाढते.मेळाव्याच्या व्यासपीठावर भरपूर पदाधिकारी बसले आहेत. प्रत्येकाने एक नगरसेवक निवडून आणला तरी पिंपरी - चिंचवड महापालिकेत शिवसेनेची सत्ता येईल, असा आशावादही खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.    

या मेळाव्यात संजय राऊत यांनी तुफान फटकेबाजी करताना आगामी काळातली सेनेची राजकीय महत्त्वकांक्षा बोलून दाखवली. संजय राऊत यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणात सामान्य घरातील युवकांना राजकारणात आणलं, असं म्हटलं. बाळासाहेब ठाकरेंनी राजकारणात सामान्यातल्या सामान्य माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं मी बाळासाहेब ठाकरेंसोबत सलग ३० वर्ष काम केलं, मात्र, पुढील पिढीनं हे काम पुढं नेलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. 

Web Title: narendra modi will also say I live in front of Sanjay raut house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.