शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीच्या पात्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला भीषण आग; २ दिवस धुराने नागरिक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 18:42 IST

विशेषतः या भागात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने हजारो विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. डोळ्यांची जळजळ, घसा दुखणे आणि श्वसनाच्या तक्रारी वाढल्याचे नागरिकांनी सांगितले

लोणी काळभोर:परिसरातील मुळा-मुठा नदीच्या पात्रात  टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला शुक्रवारी (दि. २७)सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले असून नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न शुक्रवारी उशिरापर्यंत सुरू होते. त्यानंतर २ दिवस आगीच्या धुराने नागरिकांना त्रास होत आहे. 

शुक्रवारी लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात विषारी धूर निर्माण झाला. हा धूर परिसरात पसरल्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. विशेषतः या भागात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने हजारो विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. डोळ्यांची जळजळ, घसा दुखणे आणि श्वसनाच्या तक्रारी वाढल्याचे नागरिकांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

स्वच्छ भारत मोहिमेच्या पार्श्वभूमीवर देशभरात स्वच्छता आणि नदी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना, लोणी काळभोर येथे मात्र नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून तो जाळण्याचा प्रकार अनेकदा उघडकीस आल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या पुणे शहराला लागून असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती आहेत. तसेच सदर ग्रामपंचायती या पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे या भागामध्ये शहरीकरण वाढते आहे. सदर महामार्गावरील या ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर हॉटेल इंडस्ट्री, मंगल कार्यालये इत्यादी आहेत. त्यामुळे सदर ग्रामपंचायतींच्या हद्दीत दररोज मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा उत्पन्न होतो. परंतु सदर ठिकाणी कचरा संकलनासाठी जागा तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिक प्रकल्प आजमितीस उपलब्ध नाही. 

त्यामुळे नाइलाजास्तव दररोज सुमारे ३० ते ३५ ट्रॉलींहून अधिक कचरा थेट नदीपात्रात आणून टाकला जातो. परिणामी नदीपात्रात आता कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.  यापूर्वी देखील या साचलेल्या कचऱ्याला अज्ञात व्यक्तींकडून आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत. 

वाढत्या वायुप्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जिल्हा प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने हस्तक्षेप करावा. तसेच पुण्याची जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा-मुठा नदीपात्रात अवैधरित्या थेट कचरा टाकणे व तो नष्ट करण्यासाठी कचरा जाळणे हे त्वरित थांबवण्यात यावे. त्यामुळे लोणी-काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींसाठी शासनाने घनकचरा व्यवस्थापन आणि त्यावरील प्रक्रियेसाठी तातडीने वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Loani Kalbhor: Massive fire in river due to waste dumping.

Web Summary : A massive fire erupted in Loani Kalbhor due to waste dumping in the river, causing severe smoke and respiratory issues for residents. Illegal waste disposal and burning plague the area, raising health concerns and demanding immediate government action for waste management.
टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरfire brigade puneपुणे अग्निशामक दलStudentविद्यार्थीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरHealthआरोग्य