शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मंचर- भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात दरडी कोसळल्या; एकेरी वाहतूक सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:46 IST

संरक्षक भिंत, गटारे वाहून गेल्याने मंचर - भीमाशंकर महामार्गाचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान

ठळक मुद्देआंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात आज मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरूमुसळधार पावसामुळे आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत

डिंभे : मंचर - भीमाशंकर राज्य महामार्गावरील पोखरी घाटात काल रात्री अचानक वाढलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे हा रस्ता काही काळ वाहतूकीसाठी ठप्प झाला होता. मात्र प्रशासणाने तातडीने हालचाल करून कोसळलेल्या दरडीचा ढिगारे बाजूला करत या घाटातून एकेरी वाहतूक सुरू केली आहे.

आज रस्त्यावरील राडारोडा हटवण्याचे काम सुरू होते. अतिवृष्टीमुळे या घाटातील संरक्षक भिंत वाहून गेल्याने घाटात रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबेगांव तालुक्याच्या आदिवासी भागात आज मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. बुधवारी रात्री पासून सुरु असलेला पाऊस अजूनही संततधार कोसळत आहे. डिंभे धरण पाणलोटक्षेत्रात संततधार सुरू असून सुरू मुसळधार पावसामुळे आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजपर्यंत या भागात एकुण ५१० मी.मी. एवढा पाऊस झाला आहे.

बुधवारी रात्री पावसाचे प्रमाण अचानक वाढल्याने मंचर - भीमाशंकर या राज्य महामार्गावरील पोखरी घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. घाटात काही ठिकाणी मोठमोठे दगडू रस्त्यावर वाहून आले आहेत. गोहे पाझर तलावाच्या वरच्या बाजूला घाटाच्या वरची बाजू खचून दगड व माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आली आहे.

काही झाडेही उन्मळून रस्त्यावर आल्याने हा रस्ता वाहतूकीसाठी पुर्णपणे बंद झाला होता. मोठ्या प्रमाणात कोसळलेल्या दरडीचे अवशेष सर्वच्या सर्व एकदम बाजूला करणे शक्य नसल्याने खालच्या बाजून राडारोडा बाजूला करत हा रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करण्यात आला असून  सध्या या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरु झाली आहे. 

टॅग्स :PuneपुणेMancharमंचरBhimashankarभीमाशंकरRainपाऊसWaterपाणीDamधरण