शहरं
Join us  
Trending Stories
1
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
4
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
5
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
6
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
7
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
8
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
9
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
10
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
11
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
12
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
13
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
14
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
15
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
16
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
17
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
18
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
19
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - हडपसर मतदारसंघातील मतविभाजनाचा लाभ कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 13:36 IST

हडपसर विधानसभा मतदारसंघात मराठा-माळी मतदारांचे वर्चस्व आहे. तर गेल्या काही वर्षांत आयटी क्षेत्राच्या विकासामुळे कॉस्मोपॉॅलिटन मतदार देखील वाढत आहेत.

ठळक मुद्देमताधिक्य राष्ट्रवादी टिकवणार का ?

- सुषमा नेहरकर-शिंदे 
हडपसर विधानसभा मतदारसंघात मराठा-माळी मतदारांचे वर्चस्व आहे. तर गेल्या काही वर्षांत आयटी क्षेत्राच्या विकासामुळे कॉस्मोपॉॅलिटन मतदार देखील वाढत आहेत. भाजपचे योगेश टिळेकर, राष्ट्रवादीचे चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होत असून, या तिरंगी लढतीचा लाभ कुणाला होणार यावर निवडणुकीची गणिते अवलंबून राहणार आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हडपसर विधानसभा मतदार संघात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही मतदारांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे व मोदी-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपले सरकार हाच टिळेकरांच्या प्रचाराचा मुद्दा आहे. तर मतदारसंघातील वाहतूक कोंडीची गंभीर समस्या, पाणीप्रश्न आणि कचरा डेपोचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादीचे चेतन तुपे रिंगणात उतरले आहेत. मनसेचे वसंत मोरे यांनी गेल्या चार-पाच वर्षांपासून मतदारसंघाची बांधणी  केली आहे. आमदार योगेश टिळेकर यांचा येवलेवाडी डी.पी. कचरा प्रकल्प, स्थानिक बांधकाम व्यावसायिकांशी संगनमताने केलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार हे प्रमुख मुद्दे घेऊन निवडणूक लढवत आहेत. टिळेकर, तुपे आणि मोरे यांच्यामध्येच हडपसरची तिरंगी लढत होत आहे. सनेचे कार्यकर्ते प्रचारामध्ये सहभागी झालेले नाहीत. सेनेकडून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत केली जात असल्याचीदेखील चर्चा आहे. यामुळे याचा टिळेकरांना फटका बसणार किंवा कसे, हे महत्त्वाचे ठरणार आहे. तर राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांना मतदारसंघात असलेले सर्व नगरसेवक मदत करणार का, वसंत मोरे कात्रजसह अन्य भागातील किती मते खाणार यावर हा निकाल अवलंबून राहणार आहे.
......
मताधिक्य राष्ट्रवादी टिकवणार का ?
लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपचे वर्चस्व असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते. तसेच राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांची संख्यादेखील भाजपच्या तुलनेत अधिक आहे.  विधानसभा निवडणुकीत हे मताधिक्य राष्ट्रवादी टिकवणार का?  हे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Puneपुणेhadapsar-acहडपसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMNSमनसेElectionनिवडणूक