शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 18:59 IST

SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

SSS Board 10th Result: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या, ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. राज्य मंडळाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून, सुमारे १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्या स्पष्ट होणार आहे.

निकाल कसा आणि कुठे पाहाल?

विद्यार्थ्यांना आपला निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर आणि आईचे नाव वेबसाईटवर अपलोड करावा लागणार आहे.
 
निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक्स:
१. results.digilocker.gov.in
२. mahahsscboard.in
३. sscresult.mkcl.org
४. results.targetpublications.org
५. results.navneet.com

गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेची प्रत

निकाल जाहीर झाल्यानंतर, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांबाबत शंका असेल, त्यांना गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेच्या प्रतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठीची प्रक्रिया निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होईल.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स

ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर त्याची प्रिंट काढून ठेवा किंवा पीडीएफ सेव्ह करा. ही प्रत तात्पुरत्या प्रवेशासाठी उपयोगी ठरते.

निकाल जाहीर होताच एकाच वेळी अनेक युजर्स वेबसाईटवर आल्यामुळे सर्व्हर स्लो होण्याची शक्यता असते. अशा वेळी घाबरून न जाता थोड्या वेळाने प्रयत्न करावा.

यंदा डिजीलॉकरवरही निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल मार्कशीट सहज मिळवता येईल.

जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी राज्य मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट मध्ये पुनर्परीक्षा घेतली जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : SSC Result Out Tomorrow: Anxious Students Can Check Online!

Web Summary : Maharashtra SSC results, for exams held in March 2026, will be declared online tomorrow, May 8th, at 1 PM. Over 16 lakh students await their results. Students can check scores using their roll number and mother's name on official websites.
टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालMaharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थी