शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
2
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
3
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
4
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
5
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
6
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
7
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
8
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
9
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
10
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
11
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
12
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
13
मरण्यापूर्वी एपस्टीनने काय लिहून ठेवलं? कुणाचा उल्लेख, ७ वर्षांनी समोर आलं पत्र
14
Firoza Khatun : जेलमध्ये जुळलं सूत! प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; जेलर फिरोजा खातूनने केलं कैद्यासोबत लग्न
15
राज्यपालांना दोनदा भेटले तरीही विजय यांना सत्तास्थापनेचं निमंत्रण नाही, राज्यघटनेत काय म्हटलंय?
16
Sangeetha Sornalingam: तृषा कृष्णनपेक्षा श्रीमंत आहे थलपति विजयची पत्नी संगीता, अभिनेत्रीपेक्षा ५ पट प्रॉपर्टी
17
Vastu Tips: घरात कामधेनूची मूर्ती म्हणजे लक्ष्मीचा वास; तुमच्याकडे आहे का? फॉलो करा  'या' वास्तु टिप्स
18
Anudan Scheme: म्हैस, गाय, शेळी, मेंढी, कोंबड्या पाळा; सरकारकडून ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळवा, योजना कोणती?
19
थलापती विजयने आपल्या आमदारांना ज्या हॉटेलमध्ये ठेवले, त्याचे एका दिवसाचे भाडे किती? जाणून घ्या...
20
आम्ही कोणीच नाही का! मोजकेच पापाराझी आलेले पाहून नीतू कपूर शॉक; नक्की काय झालं?
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 15:37 IST

Operation Sindoor News: आज ऑपरेशन सिंदूर कारवाईच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अवघ्या साडे  तीन दिवसांच्या कारवाईदरम्यान, पाकिस्तानच्या उडवलेल्या धुळधाणीबाबत माहिती दिली.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला  प्रत्युत्तर म्हणून  भारतीय सैन्यदलांनी गतवर्षी ७ मे ते १० मे या कालावधील ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे आणि लष्करी तळांना लक्ष्य केले  होते. आज या कारवाईच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही सैन्य दलांच्या अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अवघ्या साडे  तीन दिवसांच्या कारवाईदरम्यान, पाकिस्तानच्या उडवलेल्या धुळधाणीबाबत माहिती दिली.

भारताच्या सैन्यदलांच्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूर ही भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना असल्याचे सांगितले. लेफ्टिनेंट जनरल राजीव घई, एअर मार्शल अवधेश भारती आणि व्हाईस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी संयुक्तपणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही कारवाई म्हणजे दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांविरोधात  भारताने दाखवलेल्या दृढ इच्छाशक्तीचं प्रदर्शन  आहे, असे सांगितले.  या कारवाईदरम्यान, भारताने पाकिस्तानची १३  विमाने पाडली. ११ तळ उद्ध्वस्त केले. तसेच १०० हून  अधिक पाकिस्तानी सैनिकांना ठार केले, अशी माहितीही त्यांनी दिली.

ऑपरेशन सिंदूरवेळी डीजीएमओ असलेल्या लेफ्टिनेंट जनरल राजीव घई यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर हा भारताच्या इतिहासातील एक मोठा क्षण सिद्ध झाला आहे. सरकारने सैन्यदलांना स्पष्ट आदेश आणि व्यावसायिक निर्णय स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे पूर्ण कारवाई अत्यंत व्यावसायिक पद्धतीने पूर्णत्वास  नेण्यात आली.

तर एअर मार्शल अवधेश भारती यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर सध्यातरी थांबवण्यात आलं आहे. भारतीय सैन्यदलाचं साधं तत्त्वज्ञान आहे, ते म्हणजे जगा आणि जगू द्या. मात्र जर कुणाला आमची शांतता हा कमकुवतपणा वाटला तर आम्ही निर्णायक कारवाई करतो, असा इशाराही त्यांनी दिला.  

English
हिंदी सारांश
Web Title : Operation Sindoor: India retaliated, destroying Pakistan's bases and aircrafts after terror attack.

Web Summary : A year after the Pahalgam terror attack, India revealed Operation Sindoor's success: 11 Pakistani bases destroyed, 13 aircraft downed, and over 100 soldiers killed in retaliation.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दल