हैदराबाद: आयपीएल २०२६ मधील ४९ व्या लीग सामन्यात सनरायझर्स हैदराबादनेपंजाब किंग्सवर ३३ धावांनी विजय मिळवला असला, तरी हा सामना पंजाबचा २२ वर्षीय युवा फलंदाज कूपर कॉन्लीच्या ऐतिहासिक खेळीसाठी ओळखला जाईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर कॉन्लीने बॅटने असा काही कहर केला की, त्याने 'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलचा खास विक्रम मोडीत काढला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित २० षटकांत २३५ धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला २० षटकांत २०२ धावांपर्यंतच मजल मारता आली. जरी पंजाबचा पराभव झाला असला, तरी कॉन्लीने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. पंजाब किंग्सकडून खेळताना एकाच डावात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणाऱ्या खेळाडूच्या यादीत कूपर कॉन्ली अव्वल स्थानी पोहोचला आहे. या सामन्यात कॉन्लीने १०७ धावांची नाबाद खेळी केली. याआधी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने गेलने २०१८ मध्ये पंजाबसाठी नाबाद १०४ धावांची खेळी केली होती. अवघ्या २२ वर्षांच्या या खेळाडूने दाखवलेल्या जिद्दीमुळे पंजाब किंग्सला जरी विजय मिळाला नसला, तरी क्रिकेट विश्वाला एक नवा भविष्यातील सुपरस्टार मिळाला आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
आयपीएलमध्ये शतक ठोकणारा सर्वात तरुण परदेशी खेळाडू
| अ.क्र. | खेळाडूचे नाव | संघ | वय (वर्षे आणि दिवस) | विरुद्ध | वर्ष |
|---|---|---|---|---|---|
| १ | कूपर कॉन्ली | पंजाब किंग्स | २२ वर्षे २५७ दिवस | सनरायझर्स हैदराबाद | २०२६ |
| २ | क्विंटन डी कॉक | दिल्ली कॅपिटल्स | २३ वर्षे १२२ दिवस | रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर | २०१६ |
| ३ | डेव्हिड वॉर्नर | दिल्ली कॅपिटल्स | २३ वर्षे १५३ दिवस | कोलकाता नाईट रायडर्स | २०१० |
| ४ | डेव्हिड मिलर | पंजाब किंग्स | २३ वर्षे ३३० दिवस | रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर | २०१३ |
| ५ | कॅमेरॉन ग्रीन | मुंबई इंडियन्स | २३ वर्षे ३५२ दिवस | सनरायझर्स हैदराबाद | २०२३ |
Web Summary : In IPL 2026, Cooper Connally's unbeaten 107 broke Chris Gayle's Punjab Kings record. Despite his heroics, Punjab lost to Sunrisers Hyderabad. Connally is now the youngest foreign player to score an IPL century.
Web Summary : आईपीएल 2026 में, कूपर कॉनली के नाबाद 107 रन ने क्रिस गेल का पंजाब किंग्स का रिकॉर्ड तोड़ दिया। उनके शानदार प्रदर्शन के बावजूद, पंजाब को सनराइजर्स हैदराबाद से हार का सामना करना पड़ा। कॉनली अब आईपीएल शतक बनाने वाले सबसे युवा विदेशी खिलाड़ी हैं।