कोल्हापूर - पशुसंवर्धन विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेंतर्गत दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढीपालन आणि कुक्कुटपालन यासारख्या पूरक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. योजनेत ५ दुधाळ गायी किंवा म्हर्शीसाठी ११.३५ लाख, शेळी-मेंढीपालनासाठी ११.३८ लाख, तर कुक्कुटपालनासाठी ३० लाख रुपयांपर्यंतचे प्रकल्प मंजूर केले जातात. यातील पात्र लाभार्थीस ५० टक्के ते ७५ टक्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
ग्रामीण युवकांना आणि शेतकऱ्यांना पशुपालनातून उद्योजक बनवणे, पशुधन आधारित व्यवसाय वाढवणे, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद आणि तालुका पातळीवर पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाकडून अंमलबजावणी होणार आहे. योजनेसाठी शासनाच्या महाडीबीटीवर ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. पण महाडीबीटीला तांत्रिक अडचण आल्याने योजनेच्या अंमलबजावणीस अजून सुरुवात झालेली नाही, असे सांगण्यात आले.
कोणत्या योजना?
दुधाळ गायी, म्हशी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना, शेळी-मेंढी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना, वैरण विकास योजना, अशा योजना राबवण्यात येणार आहेत.
पात्रता आणि निकष काय ?
भूमिहीन, अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, महिला बचत गटातील लाभार्थी यांना योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे.
कोणत्या व्यवसायांसाठी किती अनुदान ?
योजनांसाठी खुल्या गटासाठी पन्नास टक्के, तर अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील लाभार्थीसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाणार आहे. योजनेत दिव्यांगांसाठी पाच टक्के, तसेच महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण राहणार आहे.
Web Summary : Maharashtra's animal husbandry scheme promotes dairy, goat farming, poultry with subsidies up to 75%. Projects for cows/buffaloes (₹11.35L), goats/sheep (₹11.38L), and poultry (₹30L) are sanctioned. Online applications are currently delayed due to technical issues.
Web Summary : महाराष्ट्र सरकार पशुपालन योजना के तहत डेयरी, बकरी पालन, मुर्गी पालन को 75% तक सब्सिडी दे रही है। गाय/भैंस (₹11.35 लाख), बकरी/भेड़ (₹11.38 लाख), और मुर्गी पालन (₹30 लाख) की परियोजनाएँ स्वीकृत हैं। तकनीकी समस्या के कारण ऑनलाइन आवेदन में देरी हो रही है।