Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला

IPL कारकिर्दीत अनेक रेकॉर्ड! सलग दोन हंगामात पर्पल कॅप जिंकण्याचाही साधलाय डाव

By सुशांत जाधव | Updated: May 7, 2026 20:08 IST

Open in App

Bhuvneshwar Kumar 200 IPL Matches:  स्विंगचा किंग भुवनेश्वर कुमार याने आयपीएलच्या आपल्या दिर्घ कारकिर्दीत अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.  आयपीएल २०२६ स्पर्धेतील ५० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा स्टार जलदगती गोलंदाजाने  मैदानात उतरताच नवा इतिहास रचला आहे. लखनौ सुपर जाएंट्स विरुद्ध  आयपीएल कारकिर्दीतील २०० वा सामना  खेळणारा तो पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे.   

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

RCB नं पहिली बोली लावली, पण पुण्याच्या संघाकडून मिळाली पहिली संधी

भुवनेश्वर कुमारने २०१० मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून आयपीएलच्या प्रवासाची सुरुवात केली. पण या हंगामात RCB च्या संघाने त्याला एकही संधी दिली नाही. RCB च्या संघाने रिलीज केल्यावर  २०११ मध्ये तो पुणे पुणे वॉरियर्स संघाचा भाग झाला. याच संघाकडून पदार्पण करताना त्याने आपली पहिली विकेट घेतली. २०१३ च्या हंगामापर्यंत तो पुण्याच्या संघाचा भाग होता. 

बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?

सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून सोडली खास छाप

२०१४ मध्ये भुवी ४.२५ कोटींच्या प्राइज टॅगसह सनरायझर्स हैदराबादचा झाला. या संघाकडूनच तो स्टार झाला. २०१६ च्या हंगामात आणि २०१७ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून त्याने अनुक्रेम २३ आणि २६ विकेट्स घेत पर्पल कॅप पटकावली होती. सलग दोन हंगामात पर्पल कॅप जिंकणारा तो एकमेव गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये २०० सामने खेळण्याचा खास विक्रम नोंदवण्याआधी याच हंगामात त्याने या स्पर्धेत २०० विकेट्सचा टप्पा गाठला होता. अशी कामगिरी करणाराही तो पहिला जलदगती गोलंदाज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhuvneshwar Kumar: Swing King Makes History, First Fast Bowler to 200 IPL Matches

Web Summary : Bhuvneshwar Kumar achieves a milestone, becoming the first fast bowler to play 200 IPL matches. Initially with RCB, he debuted with Pune, later starring for Sunrisers Hyderabad. He also holds the record for consecutive Purple Caps and was the first pacer to 200 wickets.
टॅग्स :आयपीएल २०२६भुवनेश्वर कुमाररॉयल चॅलेंजर्स बेंगलोरलखनौ सुपर जायंट्स