शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतरचा हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
6
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
10
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
11
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
12
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
13
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
14
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
15
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
16
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
17
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
18
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
19
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
20
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 19:34 IST

NCP Jay Pawar News: अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची सर्वच बारामतीकरांची इच्छा होती, असे जय पवार यांनी म्हटले आहे.

NCP Jay Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते जय अजित पवार यांनी बारामती येथे  जनता दरबाराची सुरुवात केली. पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. २०२९ मध्ये सुनेत्रा पवार या केवळ बारामती मतदारसंघाच्या उमेदवार नसतील, तर त्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार असतील, असा मोठा दावा जय पवार यांनी केला. जनता दरबारानंतर जय पवार पत्रकारांशी बोलत होते. 

बारामतीतील जनतेच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी जय अजित पवार जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना भेटणार आहेत. अजितदादा हे दर आठवड्याला जनता दरबार घेत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करत होते. तोच प्रयत्न मी केला. पहिल्याच जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळाला. आरोग्य, शिक्षण, वीज, पाणी, रस्ते अशा अनेक समस्या नागरिकांनी मांडल्या. या प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात दिल्या आहेत. पाणीप्रश्नावर उपाययोजना करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिल्या आहेत, अशी माहिती जय पवार यांनी दिली.

२०२९ला सुनेत्रा पवारमुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असतील

काही दिवसांपूवर्वी माझ्या जवळच्या सहकार्यांबरोबर चर्चा झाली. अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची सर्वच बारामतीकरांची इच्छा होती. आता ‘वहिनी’ देखील खूप कष्ट घेत आहेत. मला वाटते की, २०२९ ला त्याच निवडणूक लढवतील. ती जागा त्यांनीच मुख्यमंत्री म्हणून घ्यायला पाहिजे, अशी इच्छा जय पवार यांनी व्यक्त केली. तसेच अजितदादा असताना शहरात सर्व व्यवस्थित होते. त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. जनाई-शिरसाईसह नदी जोड प्रकल्पाला निधी मिळावा यासंबंधी मुख्यमंत्री व सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाली आहे. लवकरच हा निधी मिळणार आहे, असा विश्वास जय पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यसभा खासदार पदासाठी माझे नाव चर्चेत असले तरी आपण यासाठी इच्छुक नाही. पण मी सर्वांच्या कामासाठी उपलब्ध असेल. या पदावर कोणाला संधी मिळणार, हे मला माहिती नाही. सुनेत्रा पवार व पार्थ पवार हे दिल्लीत आहेत. दोन दिवसांनी मुंबईला गेल्यावर याची माहिती घेईन आणि या विषयावर बोलेन, असे जय पवार म्हणाले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunetra Pawar to be CM candidate in 2029: Jay Pawar

Web Summary : Jay Pawar predicts Sunetra Pawar will be a CM candidate in 2029, launching a public forum in Baramati to address citizen issues. He aims to continue Ajit Dada's work, focusing on solving problems related to water, health and education.
टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJay Pawarजय पवारSunetra Pawarसुनेत्रा पवारAjit Pawarअजित पवारChief Ministerमुख्यमंत्रीBaramatiबारामती