जेव्हा तुम्ही खाण्याचे एखादं पाकीट खरेदी करता, तेव्हा त्यावर लाल किंवा हिरव्या रंगाचा मार्क, ओळ किंवा ठिपका (Dot) नक्कीच पाहत असाल. हा मार्क तुम्ही खरेदी करत असलेली वस्तू पूर्णपणे शाकाहारी (Veg) आहे की मांसाहारी (Non-Veg) आहे हे दर्शवतो. साधारणपणे लोक फक्त हिरव्या आणि लाल रंगाचा मार्क पाहूनच अंदाज लावतात.
काही खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर निळ्या (Blue) किंवा पिवळ्या (Yellow) रंगाचा मार्क देखील असतो. अनेक लोकांना या रंगांच्या मार्कचा अर्थ माहित नसतो. या मार्कचा एक खास अर्थ असतो जो प्रत्येकाला माहित असायला हवा.
फूड पॅकेजिंगवरील पिवळा मार्क (Yellow Mark)
जर तुम्ही शाकाहारी असाल, अंडी खात नसाल, तर तुम्हाला फूड पॅकेजिंगकडे बारकाईने पाहणं गरजेचं आहे. पाकिटावर लाल मार्क नाही म्हणजे त्यात अंडं नाही, असं मानणं चुकीचं ठरू शकतं. पाकिटावरील पिवळा मार्क (Yellow Dot) हे संकेत देतो की ते अन्न 'एगिटेरियन' (Eggetarian) आहे. म्हणजेच, जर तुम्ही पाकिटावर पिवळा मार्क पाहिला तर समजून जा की यात अंडं आहे.
फूड पॅकेजिंगवरील निळा मार्क (Blue Mark)
काही फूड पॅकेट्सवर तुम्ही निळा मार्क देखील पाहिला असेल. जर तुम्हाला निळ्या ठिपक्याचा अर्थ माहित नसेल आणि तो पाहून तुमचा गोंधळ होत असेल, पाकिटावरील निळा मार्क (Blue Dot) हे दर्शवतो की हे अन्न 'लो शुगर' (Low Sugar) किंवा कमी साखरेचं आहे. जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) असेल, तर तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता.
फूड पॅकेजिंगवरील हिरवा मार्क (Green Mark)
फूड पॅकेजिंगवर हिरवा मार्क (Green Dot) असेल तर याचा अर्थ ते अन्न पूर्णपणे शाकाहारी आहे. तुम्ही हे अन्न निसंकोचपणे खाऊ शकता, कारण यात कोणत्याही मांसाहारी घटकाची भेसळ नसते.
फूड पॅकेजिंगवरील लाल मार्क (Red Mark)
फूड पॅकेजिंगवर लाल मार्क (Red Dot) असेल तर याचा अर्थ या अन्नामध्ये मांसाहारी घटक मिसळलेले आहेत. म्हणजेच हे अन्न मांसाहारी आहे किंवा ते तयार करण्यासाठी मांसाहारी गोष्टींचा वापर करण्यात आला आहे.
Web Summary : Food package color codes reveal vegetarian, non-vegetarian, egg content, and low-sugar status. Green is vegetarian, red is non-veg, yellow indicates egg, and blue signifies low sugar.
Web Summary : फूड पैकेज रंग कोड शाकाहारी, मांसाहारी, अंडे की सामग्री और कम चीनी की स्थिति बताते हैं। हरा शाकाहारी, लाल मांसाहारी, पीला अंडा और नीला कम चीनी का संकेत देता है।