शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 21:28 IST

1 / 7
देशातील आघाडीची टायर कंपनी म्हणून ओळख असलेल्या MRF ने आपले चौथ्या तिमाहीचे (Q4) आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. कंपनीच्या नफ्यात ३७ टक्क्यांची बंपर वाढ झाली आहे. यानंतर आता भारतातील 'सर्वात महागडा शेअर' असलेल्या या कंपनीने आपल्या भागधारकांसाठी लाभांश (Dividend) देण्याची घोषणा केली आहे. सध्या MRF चा एक शेअर १२९९६५ रुपयांवर आहे.
2 / 7
नुकत्याच संपलेल्या मार्च तिमाहीत MRF कंपनीचा स्टँडअलोन निव्वळ नफा तब्बल ६८० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा नफा ४९८ कोटी रुपये एवढा होता.
3 / 7
कंपनीच्या महसुलात तब्बल १३.९% वाढ - याच बरोबर कंपनीच्या महसुलातही १३.९% एवढी वाढ झाली असून तो ७९०८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
4 / 7
२०२६ साठी प्रति शेअर लाभांश २३५ रुपये - गुंतवणूदारांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, कंपनीने प्रति शेअर २२९ रुपये एवढा अंतिम लाभांश जाहीर केला आहे. याच बरोबर, अंतरिम लाभांशासह आर्थिक वर्ष २०२६ साठी, प्रति शेअर एकूण लाभांश २३५ रुपये एवढा झाला आहे.
5 / 7
महत्वाचे म्हणजे, MRF ने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तब्बल ३०००० कोटी रुपयांच्या विक्रीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. ट्रक, प्रवासी वाहने आणि दुचाकी विभागातील नवीन उत्पादनांमुळे कंपनीच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसत आहे.
6 / 7
कंपनी, पारंपारिक इंधन वाहनांच्या (ICE) टायर पुरवठ्याच्या बाबतीत अग्रेसर आहेच. शिवाय, इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) क्षेत्रातही सर्वात पसंतीची पुरवठादार बनली आहे. कंपनी आपले टायर जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात करते.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketस्टॉक मार्केटMONEYपैसा