वॉशिंग्टन : अमेरिका व इराण हे दोन्ही देश युद्ध थांबवण्यासाठी प्राथमिक कराराच्या उंबरठ्यावर असल्याचे वृत्त समोर आले असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा धमकी दिली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यास नकार दिल्यास तीव्र बॉम्बहल्ले करू, असा थेट इशारा ट्रम्प यांनी बुधवारी दिला.
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये म्हटले की, इराणसोबत सुरू असलेले युद्ध लवकरच संपुष्टात येऊन तेल व नैसर्गिक वायूची वाहतूक पुन्हा सुरू होऊ शकते. मात्र, हे इराणने प्रस्तावित करार स्वीकारण्यावर अवलंबून आहे. इराणने करार मान्य केला नाही, तर पुन्हा बॉम्बहल्ले सुरू होतील व ते अधिक तीव्र आणि व्यापक असतील. अमेरिकन माध्यम ‘ॲक्सिओस’ने दिलेल्या वृत्तानुसार, युद्ध थांबवण्यासाठी आणि अणुचर्चेची रूपरेषा ठरवण्यास अमेरिका व इराण एकपानी सामंजस्य कराराच्या जवळ पोहोचले आहेत. पुढील ४८ तासांत इराणकडून प्रतिसाद अपेक्षित असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.
इराणसाठी मुख्य अटी कोणत्या?
युरेनियम संवर्धनावर बंदी : इराणने त्यांचे अणू कार्यक्रम आणि युरेनियम संवर्धन थांबवणे आवश्यक आहे.
हल्ल्यांना पूर्णविराम : इराण आणि त्यांच्या समर्थित गटांनी (उदा. हौती बंडखोर, हिजबुल्लाह) अमेरिकन मालमत्ता आणि मित्र राष्ट्रांवरील ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले पूर्ण बंद करावेत.
सागरी मार्ग मोकळा करणे : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांना कोणताही अडथळा न आणण्याचे आश्वासन इराणला द्यावे लागेल.
अमेरिकेसाठी मुख्य अटी कोणत्या?
निधी मुक्त करणे : अमेरिका इराणचा परदेशात गोठवलेला अब्जावधी डॉलर्सचा निधी (अंदाजे १०-१५ अब्ज डॉलर्स) टप्प्याटप्प्याने मुक्त करेल.
नौदल नाकेबंदी उठवणे : इराणच्या बंदरांभोवती अमेरिकेने केलेली नौदल नाकेबंदी मागे घेतली जाईल, ज्यामुळे इराणला पुन्हा कच्च्या तेलाची निर्यात करता येईल.
लष्करी कारवाया थांबवणे : 'ऑपरेशन एपिक फ्युरी' अंतर्गत होणारे हवाई हल्ले आणि लष्करी कारवाया अमेरिका अधिकृतपणे बंद करेल.
Web Summary : Trump threatens Iran with renewed bombing if it refuses a deal regarding the Hormuz Strait. The US and Iran are nearing an agreement to de-escalate tensions, contingent on Iran halting uranium enrichment and attacks, in exchange for sanctions relief.
Web Summary : ट्रंप ने ईरान को होर्मुज जलडमरूमध्य पर समझौते से इनकार करने पर फिर से बमबारी की धमकी दी। अमेरिका और ईरान तनाव कम करने के लिए एक समझौते के करीब हैं, जो ईरान द्वारा यूरेनियम संवर्धन और हमलों को रोकने पर निर्भर है, जिसके बदले में प्रतिबंधों में राहत मिलेगी।