Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 05:29 IST

महाराष्ट्र आणि गोव्यात ७ ते ११ मेदरम्यान उष्णता वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रावरील अँटिसायक्लोन पुढील आठवड्यात कमी होण्याआधी कोकण किनारपट्टीवरदेखील तापमान वाढ अपेक्षित आहे.

मुंबई : अरबी समुद्रातील उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून आजपासून ११ मेपर्यंत कोकणासह राज्याच्या विविध भागांत कमाल तापमानाचा पारा चढा राहील. मुंबईत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता असून, विदर्भासह मराठवाड्यात पारा चाळीशी नोंदविण्यात येईल. तर ९ ते ११ मेदरम्यान सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, वाशिम, जालना, वर्धा, यवतमाळ आणि नागपूर या भागांत मान्सून पूर्व पावसासह काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.

शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार

महाराष्ट्र आणि गोव्यात ७ ते ११ मेदरम्यान उष्णता वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अंदाज आहे. अरबी समुद्रावरील अँटिसायक्लोन पुढील आठवड्यात कमी होण्याआधी कोकण किनारपट्टीवरदेखील तापमान वाढ अपेक्षित आहे. हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांच्याकडील माहितीनुसार, वाऱ्याची दिशा बदलेल. समुद्रातून जमिनीकडे वाहणारे वारे थोडे विलंबाने म्हणजे दुपारी स्थिर होतील. तोवर उष्णतेमुळे हवामान तापेल आणि तापमान अधिक नोंदवले जाईल.

महामुंबईचा पारा ४२ वर!

९ ते ११ मेदरम्यान गोवा आणि दक्षिण तसेच किनारी कोकण भागात, मुंबईसह तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसवर जाईल. तर नवी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये तापमान ३७ ते ३९ अंशांपर्यंत पोहोचू शकते. जव्हार, शहापूर, कल्याण-डोंबिवली आणि महाड परिसरात ४० ते ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले जाऊ शकते. त्यामुळे या भागात उन्हाचे अक्षरश: चटके बसतील. त्याचबरोबर मुंबईत आर्द्रता अधिक राहील. त्यामुळे तापमान ३४ किंवा ३५ असले तरी उकाड्यामुळे घामाच्या धारा वाहतील.

आर्द्रता वाढ, पूर्वेकडील वारे यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच घाट परिसरात मान्सूनपूर्व सरी व विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हे ढग पश्चिमेकडे सरकत मुरबाड, लोणावळा आणि महाड भागात हलक्या सरी देऊ शकतात.

मध्य महाराष्ट्रात, पुणे व नाशिक येथे शनिवारपर्यंत तापमान ३६ ते ३८ अंश राहील. रविवार आणि सोमवारी ३९ ते ४१ अंशांपर्यंत वाढू शकते. येथेही काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai to Heat Up; Hailstorm Expected in Central Maharashtra, Marathwada

Web Summary : Mumbai's temperature will rise to 36°C, with Vidarbha and Marathwada reaching 40°C. Hailstorms are likely in parts of central Maharashtra and Marathwada between May 9-11. Heatwave conditions are expected in Maharashtra and Goa, with potential pre-monsoon showers in some areas.
टॅग्स :तापमान