पुणे : बीड, चाकण आणि नसरापूरची लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अल्पवयीन मुलीवर आजोबांनी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पर्वती परिसरात घडली. नराधम आजोबाला बुधवारी पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी हा अल्पवयीन मुलीचा आजोबा असून, पीडित मुलगी आरोपीच्या मुलीची मुलगी असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. मंगळवारी आरोपी मुलीला एका खोलीत घेऊन गेला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर तेथील महिलांना संशय आल्याने त्यांनी दरवाजा उघडून खोलीत प्रवेश केला.
तेव्हा मुलीचे कपडे काढल्याचे दिसले. नागरिकांनी आरोपीला चोप दिला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र, परिसरात तणावाचे वातावारण निर्माण झाले होते. नागरिकांनी पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले. या घटनेमुळे काही काळ त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला हाेता.
राज्यभरात संताप व्यक्त
काही दिवसांपूर्वीच बीडच्या केज तालुक्यात एका ५४ वर्षीय नराधम आजोबाने आपल्या अवघ्या ३ वर्षांच्या नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर नसरापूर प्रकरण आणि चाकणमध्येही तीन वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याचा खून केल्याने राज्यभरात संताप व्यक्त हाेत आहे.
वडील, मामा, मामेभावाच्या वासनेची बनली शिकार
कोल्हापूरात नवव्या वर्षांपासून पीडित मुलगी जवळच्या नातेवाइकांच्या वासनेची शिकार बनली. जन्मदाते वडील, मामा, मामाच्या अल्पवयीन मुलाने गेली पाच वर्षे वारंवार अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने वडिलांना आणि मामाला अटक केली.
१० वर्षीय मुलीवर वृद्धाचा अत्याचार; आरोपी फरार
अकाेल्यातील चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १० वर्षीय मुलीवर एका ६० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवार, ५ मे रोजी सायंकाळी उघडकीस आली.
या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून, आरोपी जगराम गोविंदा आडे (वय ६०) हा फरार झाला आहे.
जालन्यात एका तरुणीचा दीर्घकाळ छळ, ब्लॅकमेलिंग करत तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची धक्कादायक घटना पारध पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पारध पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा छळ २०१६ पासून सुरू होता. पीडिता अवघ्या १५ वर्षांची असताना शेख इमरान शेख हबीब पिंजारी (वय ३७) या संशयित आरोपीने ती घरात एकटी असताना तिचे अश्लील फोटो काढले. ‘हे फोटो शाळेत दाखवून व्हायरल करीन’, अशी धमकी दिली.
मार्च २०१८ मध्ये पीडिता कॉलेजला जात असताना आरोपीने तिला बळजबरीने छत्रपती संभाजीनगरातील उस्मानपुरा भागातील एका नातेवाइकाच्या घरी नेऊन अत्याचार केला. त्यानंतर जालना येथे देखील अत्याचार केला होता.
Web Summary : Pune faces outrage as a grandfather attempts to assault his granddaughter. This incident follows similar cases in Beed, Nasrapur and Chakan. Other disturbing reports include a Kolhapur girl abused by relatives and a Jalna woman pressured for religious conversion after blackmail.
Web Summary : पुणे में दादा द्वारा पोती पर हमले के प्रयास से आक्रोश है। यह घटना बीड, नसरापुर और चाकन के समान मामलों के बाद हुई है। अन्य परेशान करने वाली रिपोर्टों में रिश्तेदारों द्वारा कोल्हापुर की एक लड़की का दुरुपयोग और जालना की एक महिला पर ब्लैकमेल के बाद धार्मिक रूपांतरण के लिए दबाव शामिल है।