कोलकाता/चेन्नई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता देशाच्या पूर्व व दक्षिण भागातील राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडींनी वेग घेतल आहे.
पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार स्थापन होणार असून, त्याचा शपथविधी समारंभ ९ मे रोजी कोलकात्यातील ‘ब्रिगेड परेड ग्राउंड’वर पार पडणार आहे.
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
दुसरीकडे, तामिळनाडूत टीव्हीके प्रमुख थलपती विजय यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यानंतर विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला आहे.
प. बंगालचे नवे सीएम कोण याची उत्सुकता
पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी बुधवारी सांगितले की, ९ मे रोजी सकाळी १० वाजता शपथविधी होईल.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक ८ मे रोजी होणार असून, मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल.
Web Summary : Bengal's BJP government will be sworn in on May 9. In Tamil Nadu, Congress supports TVK's Thalapathy Vijay, who then claimed government formation.
Web Summary : बंगाल में बीजेपी सरकार 9 मई को शपथ लेगी। तमिलनाडु में कांग्रेस ने टीवीके के थलपति विजय का समर्थन किया, जिसके बाद उन्होंने सरकार बनाने का दावा पेश किया।