शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
3
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
4
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
5
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
6
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
7
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
8
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
9
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
10
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
11
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
12
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
13
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
14
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
15
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
16
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
17
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
18
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
19
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
20
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
Daily Top 2Weekly Top 5

एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 05:53 IST

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक सातत्याने बरे झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, पण प्रतिसाद मिळत नाही.

प्रज्ञा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ‘‘एकदा घरी फोन करा ना... आई आमचा आवाज ऐकून नक्की येईल’’, ‘‘भावाला सांगा मला न्यायला...’’ या निरागस आणि आर्त हाका आहेत ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील अशा व्यक्तींच्या, ज्या उपचारानंतरबऱ्या झाल्या आहेत. मात्र, आजारपणातून मुक्त होऊनही ही मंडळी अद्याप रुग्णालयाच्या चार भिंतींतच अडकून पडली आहेत, कारण त्यांच्या हक्काच्या माणसांनीच त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.

भोळी आशा हे रुग्ण भोळ्या

आशेवर जगत आहेत. आज नाही तर उद्या आपली माणसे येतील, आपल्याला मिठी मारतील आणि घरी घेऊन जातील. पण, वास्तव मात्र वेगळेच आहे. रुग्णालयाकडून वारंवार प्रयत्न करूनही अनेक नातेवाईक संपर्कात येत नाहीत, काही जण टाळाटाळ करतात, तर काही फोनलाही प्रतिसाद देत नाहीत.

संपर्क साधूनही दुर्लक्ष

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक सातत्याने बरे झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, पण प्रतिसाद मिळत नाही.

अशा आहेत हृदयद्रावक कहाण्या...

लीना (४०, नाव बदलले आहे): गेल्या वर्षभरापासून आईच्या आठवणीत व्याकूळ आहे. आईच्या हातचे जेवण जेवायचे आहे, असे म्हणताना तिचे डोळे पाणावतात. जून २०२५ पासून तिच्या नातेवाइकांना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र अद्याप कोणीही प्रतिसाद दिलेला नाही.

राजेश्री (४८, नाव बदलले आहे): उच्चशिक्षित असलेली राजेश्री ‘अनोळखी रुग्ण’ म्हणून दाखल झाली होती. आता ती पूर्णपणे बरी असून तिला घरी जायचे आहे. शॉर्टसर्किटमुळे तिचे घर जळाले असून आई आणि भाऊ वेगळे राहतात. मी एकटी राहायला तयार आहे, असे ती सांगते, मात्र तिच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.

लक्ष्मी (५१, नाव बदलले आहे): डिसेंबर २०२४ मध्ये दाखल झालेली लक्ष्मी उपचारानंतर घरी जाण्यास सज्ज आहे. मात्र, तिचे नातेवाईक आजतागायत तिला भेटायलाही आलेले नाहीत.

रुग्णांचे पुनर्वसन करण्यासाठी

आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी किमान एकदा भेट द्यावी, ही अपेक्षा आहे. समाज आणि सामाजिक संस्थांनीही पुढे येण्याची गरज आहे.

डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक

English
हिंदी सारांश
Web Title : Call home, Mom, take me. Mentally ill await love.

Web Summary : Cured patients at Thane Mental Hospital long for family. Abandoned, they yearn for home. Relatives are unresponsive, leaving them stranded despite recovery. Hospital pleads for family contact and societal support for rehabilitation.
टॅग्स :thaneठाणे