शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 10:58 IST

Chandranath Rath Murder: सुवेंदु अधिकारी यांनी त्यांचे पीए चंद्रनाथ रथ यांच्या हत्येला 'पूर्वनियोजित कट' म्हटले आहे. बंगालमध्ये हिंसाचाराप्रकरणी ४३३ जण अटकेत. वाचा सविस्तर वृत्त.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झालेल्या रक्ताच्या खेळावर भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांनी अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला आहे. आपले खाजगी सचिव चंद्रनाथ रथ यांच्या हत्येला त्यांनी पूर्वनियोजित हत्या म्हटले असून, राज्यातील परिस्थितीला 'महा-जंगलराज' असे संबोधले आहे.

मध्यग्राम येथील घटनास्थळी भेट दिल्यानंतर सुवेंदु अधिकारी म्हणाले की, "ही हत्या पूर्णपणे विचारपूर्वक आखलेला कट होता. डीजीपींनी देखील याला दुजोरा दिला आहे की, ही एक सुनियोजित घटना आहे. हत्या करण्यापूर्वी २-३ दिवस या भागाची रेकी करण्यात आली होती. ४-५ मोटारसायकलींवरून आलेल्या गुंडांनी चंद्रनाथ यांच्या छातीत गोळ्या झाडल्या, यावरून त्यांचा हेतू स्पष्ट होतो."

दिल्लीतील नेतृत्वाची दखल
या घटनेची गांभीर्याने दखल घेत भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाने माहिती मागवली आहे. केंद्रीय मंत्री सुकान्त मजूमदार यांनी मृत चंद्रनाथ यांच्या कुटुंबाशी आणि पोलिसांशी संवाद साधला आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २०० गुन्हे दाखल केले असून ४३३ जणांना अटक केली आहे. तसेच १,१०० हून अधिक लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.

"गुंडांचा नाश करणार"
ममता बॅनर्जींच्या शासनावर हल्लाबोल करताना सुवेंदु अधिकारी म्हणाले, "हे गेल्या १५ वर्षांतील महा-जंगलराजचे फळ आहे. पण आता भाजप स्वस्थ बसणार नाही. आम्ही इथल्या गुंडांचा नायनाट करण्याचे काम लवकरच सुरू करू."

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Vows to Eradicate Goons After Leader's Murder in Bengal

Web Summary : Suvendu Adhikari condemns the murder of his aide, Chandra Nath Rath, calling it pre-planned. BJP leadership demands action, vowing to eliminate goons from West Bengal. Police have arrested 433 people in connection with the post-election violence.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीElectionनिवडणूक 2026