शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
3
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
4
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
5
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
7
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
8
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
9
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
10
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
11
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
12
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
13
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
14
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
15
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
16
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
17
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
18
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
19
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 09:31 IST

AIADMK मधील अंतर्गत घडामोडींच्या आणि असंतोषाच्या बातम्या येत असतानाच ही नवी बातमी समोर आली आहे.

चेन्नई - तामिळनाडू विधानसभेच्या निकालात अभिनेता विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष बनला असला तरीही बहुमतासाठी त्यांना आणखी १० जागांची गरज आहे. विधानसभेत बहुमताचा ११८ गाठण्यासाठी तामिळनाडूत राजकीय हालचालींना वेग आला आहे. टीव्हीकेला काँग्रेसच्या ५ आमदारांनी पाठिंबा दिला आहे. टीव्हीकेने विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकल्या आहेत. त्यात काँग्रेसच्या पाठबळामुळे टीव्हीकेची संख्या ११३ पर्यंत पोहचली आहे. अभिनेता थलापती विजय याने राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. परंतु ११८ चे बहुमत मिळवण्यासाठी टीव्हीकेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

टीव्हीकेने त्यांच्या १०८ आमदारांना चेंगलपट्टूच्या एका हॉटेलमध्येच थांबवले आहे. त्यांना सत्ता स्थापनेसाठी ११८ आमदारांची गरज आहे. त्यामुळे राज्यात घोडेबाजार दाट शक्यता आहे. आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यात अण्णा द्रमुक पक्षात फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्सला वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार AIADMK चे ज्येष्ठ नेते राज्यसभा खासदार आणि पक्षप्रमुख एडप्पाडी के. पलानीस्वामी यांचे निकटवर्तीय सी.व्ही. षण्मुगम यांनी पुदुचेरी येथे एका हॉटेलमध्ये २० खोल्या बुक केल्या आहेत. पक्षाकडून सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण वाटाघाटींच्या काळात आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्याच्या उद्देशाने अनेक आमदार आधीच पुदुचेरी येथे पोहोचले आहेत तर इतर काहीजण वाटेवर आहेत.

AIADMK मधील अंतर्गत घडामोडींच्या आणि असंतोषाच्या बातम्या येत असतानाच ही नवी बातमी समोर आली आहे. AIADMK च्या आमदारांचा एक गट विजय यांच्या 'तमिळगा वेट्री कझगम' (TVK) पक्षाला पाठिंबा देण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. TVK हा पक्ष १०८ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला  तरी सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ११८ जागांच्या बहुमताचा आकडा गाठण्यात ते अजूनही कमी पडत आहे. या घडामोडींमध्ये आणखी भर पडली जेव्हा DMK ने आपला जुना प्रतिस्पर्धी पक्ष असलेल्या AIADMK सोबत पडद्याआड चर्चा सुरू केल्याचे वृत्त समोर आले. सध्या दोन्ही पक्षांकडील जागांची संख्या अगदीच काठावरची डिएमकेकडे ५९ आणि AIADMK कडे ४७ जागा आहेत. परंतु AIDMK चे २८ आमदार षण्मुगम यांच्या नेतृत्वात एकवटल्याचे दिसून येते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Nadu: Resort politics as AIADMK MLAs may support TVK.

Web Summary : Tamil Nadu sees resort politics as AIADMK's 28 MLAs head to Puducherry, potentially backing actor Vijay's TVK party, which needs support to reach a majority. DMK is also reportedly in talks with AIADMK.
टॅग्स :Assembly Election Resultsविधानसभा निवडणूक निकाल २०२६TamilnaduतामिळनाडूThalapathy Vijayथलपती विजयElectionनिवडणूक 2026