1 / 5मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले भाजपाचे नेते आणि आमदार सुवेंदू अधिकारी यांच्या स्वीय सहायकाचीच हत्या करण्यात आली. उत्तर २४ परगना जिल्ह्यातील मध्यग्राममध्ये बुधवारी (६ मे)रात्री ही घटना घडली. या घटनेने बंगालमधील राजकीय हिंसाचार आणखी तीव्र झाला आहे.2 / 5चंद्रनाथ रथ यांच्या हत्येबद्दल बोलताना आमदार सुवेंदू अधिकारी यांनी ही राजकीय हत्याच आहे. दोन-तीन दिवस चंद्रनाथ रथ यांची रेकी केली गेली. कट रचून त्यांना मारण्यात आले, असे म्हटले आहे.3 / 5चंद्रनाथ रथ यांनी सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहायक म्हणून काम करण्यापूर्वी हवाई दलातही सेवा केली आहे. हवाई दलात नोकरी करत असतानाच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर काही काळ त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केले होते.4 / 5नंतर चंद्रनाथ रथ हे राजकीय समन्वय आणि प्रशासकीय कामे करु लागले. २०१९ मध्ये जेव्हा सुवेंदू अधिकारी ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये मंत्री असतानाच चंद्रनाथ रथ हे त्यांच्या टीममध्ये सामील झाले होते. सुरुवातीला त्यांनी मंत्रालयील जबाबदाऱ्या सांभाळल्या.5 / 5चंद्रनाथ रथ यांचे कुटुंबीय आधीपासूनच तृणमूल काँग्रेसशी जोडलेले होते. सुवेंदू अधिकारी यांनी पक्षांतर केल्यानंतर ते भाजपाशी जोडले गेले. चंद्रनाथ रथ हे जवळपास वीस वर्षांपासून अधिकारी यांच्यासोबत काम करत होते.