नवी मुंबई : मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर १ मेपासून लागू केलेल्या एसी लोकलच्या नव्या वेळापत्रकामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल रेल्वे स्थानकादरम्यान नॉन-एसी लोकलच्या जागी एसी सेवा सुरू केल्याने सायंकाळच्या गर्दीच्या वेळी गैरसोय वाढल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे. यातूनच त्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरामदायी प्रवासासाठी एसी लोकल सुरू केल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे असले, तरी त्याचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने बहुतांश प्रवासी नॉन-एसी लोकलवरच अवलंबून आहेत. परिणामी उपलब्ध डब्यांमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. सायंकाळी ६:२६ वाजण्याची पनवेल स्लो लोकल हजारो नोकरदारांसाठी महत्त्वाची मानली जाते. मात्र, सीएसएमटी बाजूला असलेल्या तीन महिला डब्यांमुळे जागा अपुरी पडत असल्याची तक्रार आहे.
रेल्वे प्रशासनाविरोधात स्वाक्षरी मोहीम
दरम्यान, पनवेलकडे प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
एसी आणि नॉन-एसी लोकलचे वेळापत्रक संतुलित ठेवावे, गाड्या वेळेत सोडाव्यात आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
दररोज १० ते १५ मिनिटे उशिर
प्रवाशांच्या मते, सायंकाळी ६:३३ वाजताची एसी लोकल हा मुख्य अडथळा ठरत आहे. या गाडीमुळे त्यानंतरची ६:४१ वाजताची नॉन-एसी लोकल दररोज १० ते १५ मिनिटे उशिराने सुटत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.
Web Summary : New AC local schedule on Harbour line sparks passenger outrage due to peak hour inconvenience. Non-AC trains are overcrowded; commuters demand balanced schedules and timely departures. Passengers report delays and launch signature campaign.
Web Summary : हार्बर लाइन पर एसी लोकल के नए समय से यात्रियों में आक्रोश है, क्योंकि पीक ऑवर में असुविधा हो रही है। गैर-एसी ट्रेनें भीड़भाड़ वाली हैं; यात्री संतुलित समय और समय पर प्रस्थान की मांग करते हैं। यात्रियों ने देरी की सूचना दी और हस्ताक्षर अभियान शुरू किया।