शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:37 IST

1 / 5
टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक खिशाला परवडणारा आणि दीर्घ मुदतीचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. विशेषतः ज्या ग्राहकांना आपला नंबर सक्रिय ठेवायचा आहे आणि जास्त डेटाची गरज नाही, त्यांच्यासाठी ४४८ रुपयांचा प्लॅन एक उत्तम पर्याय ठरत आहे.
2 / 5
जिओच्या ४४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना खालील सुविधा मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडिटी ८४ दिवस (सुमारे ३ महिने) आहे. कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग याद्वारे मिळणार आहे. तसेच १००० एसएमएस मोफत मिळणार आहेत.
3 / 5
मुळात हा प्लॅन कोणाला दिसत नाही. जिओ देखील ८४ दिवसांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दाखवत नाही. तुम्ही जर '448' असे सर्चमध्ये टाकले तरच तुम्हाला हा प्लॅन दिसणार आहे. यानंतर हा प्लॅन निवडून तुम्ही रिचार्ज करू शकणार आहात.
4 / 5
जर आपण या प्लॅनच्या खर्चाचे गणित मांडले, तर ८४ दिवसांसाठी ४४८ रुपये म्हणजे एका महिन्याचा (२८ दिवस) खर्च सुमारे १४९ रुपयांच्या दरम्यान येतो. इतर ८४ दिवसांच्या प्लॅनच्या तुलनेत हा प्लॅन अत्यंत फायदेशीर मानला जात आहे.
5 / 5
ज्या युजर्सना वारंवार रिचार्ज करण्याची कटकट नको आहे आणि जे मध्यम स्वरूपात डेटा वापरतात किंवा फक्त कॉलिंग लागते, त्यांच्यासाठी हा प्लॅन सर्वोत्तम आहे. तसेच ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीमुळे हा प्लॅन 'व्हॅल्यू फॉर मनी' ठरत आहे.
टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओ