कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात हिंसाचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. भाजपचे दिग्गज नेते सुवेंदु अधिकारी यांचे खाजगी सचिव चंद्रनाथ रथ यांची बुधवारी रात्री उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राममध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या खळबळजनक प्रकरणामुळे बंगालच्या राजकारणात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रनाथ रथ हे बुधवारी रात्री कोलकात्याहून मध्यमग्राम येथील आपल्या घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या कारला दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी घेरले आणि अत्यंत जवळून गोळीबार केला. चंद्रनाथ यांना तीन गोळ्या लागल्या असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात त्यांचा सुरक्षा रक्षक आणि चालक देखील जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तपासाची चक्रे वेगवान
या प्रकरणी पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला असून आतापर्यंत तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र, गोळीबार करणारा मुख्य हल्लेखोर अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रांना वेग दिला आहे.
सुवेंदु अधिकारींचा संताप
सुवेंदु अधिकारी यांनी ही घटना 'पूर्व नियोजित कट' असल्याचे म्हटले आहे. "दोन-तीन दिवसांपासून रेकी करून हा हल्ला करण्यात आला आहे. डीजीपींनी देखील हे मान्य केले आहे की ही सुनियोजित हत्या आहे," असा आरोप अधिकारी यांनी केला आहे. भाजपने या हत्येसाठी तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे, तर टीएमसीने हे आरोप फेटाळले असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
'ग्लॉक ४७X' चा वापर
तपासातील सर्वात मोठा अपडेट म्हणजे, हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार करण्यासाठी ग्लॉक ४७X (Glock 47X) या आधुनिक पिस्तूलचा वापर केला होता. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची महागडी आणि आधुनिक शस्त्रे सामान्य गुन्हेगार वापरत नाहीत. यावरून हा हल्ला एखाद्या व्यावसायिक शूटर्सनी केल्याचा संशय बळावला आहे.
Web Summary : Suvendu Adhikari's personal assistant, Chandranath Rath, was shot dead in West Bengal. Police are investigating three suspects while the main shooter is at large. A sophisticated Glock 47X pistol was used in the planned attack, raising suspicions of professional involvement. BJP blames TMC, who deny involvement.
Web Summary : पश्चिम बंगाल में सुवेंदु अधिकारी के निजी सहायक चंद्रनाथ रथ की गोली मारकर हत्या कर दी गई। पुलिस तीन संदिग्धों से पूछताछ कर रही है, जबकि मुख्य हमलावर फरार है। सुनियोजित हमले में ग्लॉक 47X पिस्तौल का इस्तेमाल किया गया, जिससे पेशेवर शामिल होने का संदेह है। बीजेपी ने टीएमसी पर आरोप लगाया, टीएमसी ने इनकार किया।