Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला

आयपीएल कारकिर्दीतील त्याचे हे दुसरे शतक ठरले

By सुशांत जाधव | Updated: May 7, 2026 22:06 IST

Open in App

Mitchell Marsh Fastest IPL Century : लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जाएंट्सचा सलामीवीर मिचेल मार्शची धमाकेदार खेळी पाहायला मिळाली. अर्शिन कुलकर्णीच्या साथीनं LSG च्या डावाची सुरुवात करणाऱ्या मिचेलनं फक्त २० चेंडूत अर्धशतक साजरे केले. पावसामुळे खेळात व्यत्यय येत असताना त्याने आपल्या तुफान फटकेबाजीतील सातत्य कायम राखत  ४९ चेंडूत IPL कारकिर्दीतील आपले दुसरे शतक झळकावले. लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाकडून कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वात जलद शतकी खेळी ठरली. याआधी २०२५ च्या हंगामात मिचेल मार्शनं गुजरात विरुद्धच्या सामन्यात ६४ चेंडूत शतक साजरे केले होते.

रिषभ पंतसह KL राहुलचा विक्रम मोडला

लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाकडून याआधी सर्वात जलद शतकी खेळीचा विक्रम हा रिषभ पंतच्या नावे होता. पंतने गत हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध ५४ चेंडूत शतक झळकावले होते. हा विक्रम मोडीत काढत LSG कडून सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मिचेल मार्श अव्वलस्थानी पोहचला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mitchell Marsh's Century Storms Lucknow After Rain Interruption: A Record!

Web Summary : Mitchell Marsh smashed a record-breaking century in just 49 balls against RCB at Lucknow's Ekana Stadium. His explosive innings, starting with a 20-ball fifty, marked the fastest century for Lucknow Super Giants, surpassing his previous record.
टॅग्स :आयपीएल २०२६रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरलखनौ सुपर जायंट्स