शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात गेल्या सहा महिन्यात तीन हजार जोडप्यांचे 'शुभमंगल' नोंदणी पद्धतीने

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2021 19:05 IST

नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडेच जोडप्यांचा कल कायम

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यातच निम्मे नोंदणी विवाह झाले आहेत.

पुणे: शासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल करून विवाह सोहळा ५० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी दिली असली तरी भव्यदिव्य विवाह करण्यावर खर्च करण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडेच अद्यापही जोडप्यांचा कल कायम आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे मार्चचा निम्मा महिना, एप्रिल आणि मे मधील काही दिवस नोंदणी कार्यालय बंद राहिल्यामुळे तसेच अनेकांच्या नोकरी, व्यवसायावर गदा आल्याने नोंदणी विवाहावर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे २०२० मध्ये नोंदणी पद्धतीने ५ हजार २२२ विवाह झाले. मात्र, अजूनही कोरोना आणि नोकरीच्या अस्थिरतेची टांगती तलावर असल्याने नोंदणी विवाहालाच जोडप्यांनी प्राधान्यक्रम दिला आहे. यावर्षी जानेवारी ते जून या सहा महिन्यांत नोंदणी पद्धतीने ३ हजार ६१२ जोडप्यांचे  ‘शुभमंगल’ पार पडले आहे. 

 गेल्या वर्षीपासून  कोरोनामुळे विवाह समारंभावर अनेक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे पाचशे ते हजार लोकांच्या उपस्थितीत विवाह करण्यावर देखील बंधने आणली गेली. विवाहासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आल्याने एकाला बोलावले आणि दुस-याला नाही यातून नातेवाईक, मित्रमंडळी दुखावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोडप्यांनी कोरोनाचे कारण पुढे करीत नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास पसंती दर्शविली आहे. यातच विवाहाच्या बाबतीत येणा-या परवानग्यांच्या अडचणी, नियामवली आणि खर्च यामुळे जोडपी पैशांची बचत करण्यावर भर देत आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा सहा महिन्यातच निम्मे नोंदणी विवाह झाले आहेत.

विवाह नोंदणी अधिकारी डी.ए. सातभाई म्हणाले,  यंदा नोंदणी पद्धतीने विवाह करणा-यांची संख्या वाढली आहे. आपल्या सोयीप्रमाणे आणि आपल्याला हवी ती तारीख निवडून जोडपी विवाहबद्ध होत आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे काही निर्बंध असल्यामुळे फक्त मे महिन्यात नोंदणी पद्धतीने विवाह करणा-यांची संख्या घटली. परंतु, जूनमध्ये पुन्हा ते प्रमाण वाढले . हे प्रमाण आणखी वाढेल असा अंदाज आहे. नोंदणी पद्धतीने विवाह करणा-साठीची प्रक्रिया खूप सुटसुटीत आहे. सध्या ५० जणांच्या उपस्थितीत विवाह करणा-याची परवानगी असली तरी नोंदणी पद्धतीने विवाह करणा-यांची संख्या घटलेली नाही

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नWomenमहिलाcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र