Join us
Daily Top 2Weekly Top 5

बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?

बुमराहसाठी खराब हंगाम, पुन्हा विकेटची पाटी राहिली कोरी

By सुशांत जाधव | Updated: May 4, 2026 22:14 IST

Open in App

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात जसप्रीत बुमराहचा फॉर्म मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचा विषय राहिला आहे. लखनौ सुपर जाएंट्स विरुद्धच्या वानखेडेच्या मैदानातील सामन्यात बुमराहची पाटी पुन्हा कोरीच राहिली. या सामन्यात हिम्मत सिंगच्या रुपात त्याने एक विकेट खात्यात जमा केली. पण तोच चेंडू नो बॉल ठरला अन् त्याच्या विकेटचा आनंद सायनरसोबत क्षणात नाहीसा झाला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

नो बॉलमुळे बुमराह विकेटलेस राहिला, गावसकरांनीही झापलं

लखनौच्या डावातील १४ व्या षटकात  तिसरा चेंडू नो बॉल टाकल्यावर त्याने एक वाइड चेंडू टाकल्यावर पुन्हा नो बॉल टाकला. यावर सामन्यादरम्यान समोलचन करणाऱ्या लिटल मास्टर सुनील गावसकरांनीही दिग्गज गोलंदाजाला झापल्याचे पाहायला मिळाले. एकवेळ वाइड बॉल समजू शकतो, पण त्याच्याकडून ओव्हर स्टेप नो बॉल अपेक्षित नाही, अशा शब्दांत गावसकरांनी नाराजी व्यक्त केली. त्यांची ही कमेंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...

नेमकं काय म्हणाले गावसकर?

जसप्रीत बुमराहनं एकाच षटकात दोन नो बॉल टाकल्यावर गावसकरांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "हे अजिबात स्वीकारार्ह नाही. तू एक प्रोफेशनल क्रिकेटर आहेस. वाइड समजू शकतो, पण नो-बॉल टाकणं हे  अजिबात पटण्याजोगे नाही." जसप्रीत बुमराहनं या सामन्यातील ३ बॉलसह यंदाच्या हंगामात ७ नो बॉल टाकले आहेत. क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजाची ही कामगिरी खटकणारी अशीच आहे.

बुमराहसाठी खराब हंगाम, पुन्हा विकेटची पाटी राहिली कोरी

यंदाचा हंगामात मुंबई इंडियन्ससह जसप्रीत बुमराहसाठी भयावह स्वप्नासारखाच राहिला आहे. पहिल्या पाच सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. पहिल्या ९ सामन्यात त्याने ३३ षटकात २८४ धावा खर्च करत फक्त ३ विकेट्स घेतल्या. लखनौ विरुद्धच्या सामन्यात ४ षटकात ४५ धावा देत तो पुन्हा विकेटलेस राहिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Bumrah's No-Balls Irk Gavaskar; Disappointing IPL Season Continues

Web Summary : Jasprit Bumrah's struggles continue in IPL. A no-ball negated his wicket against Lucknow. Sunil Gavaskar criticized Bumrah's no-balls, calling them unacceptable for a professional. Despite his experience, Bumrah's performance remains concerning, with seven no-balls this season and a largely wicketless run for Mumbai Indians.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्सजसप्रित बुमराहसुनील गावसकर